Pages

Showing posts with label Raita. Show all posts
Showing posts with label Raita. Show all posts

Tuesday, 6 March 2012

मुळ्याचे रायते - Mulyache Raite

Mulyache Raite in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

raddish Raita, muli ka rayta, mulyache raiteसाहित्य:
१ कप किसलेला पांढरा मुळा
३/४ ते १ कप दही, फेटलेले
१/४ टीस्पून जिरे पूड (ऐच्छिक)
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१/२ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट (किंवा चवीनुसार)
१/२ टीस्पून साखर
चवीपुरते मीठ
ऐच्छिक साहित्य: १/२ टीस्पून तेल, चिमटीभर हिंग, चिमटीभर जिरे

कृती:
१) दही, जिरेपूड, मीठ, साखर, आणि हिरवी मिरची पेस्ट वाडग्यात मिक्स करावे. २-३ टेस्पून दुध घालून दह्याचा घट्टपणा किंचित कमी करावा.
२) दह्यात किसलेला मुळा आणि कोथिंबीर घालावी. मिक्स करावे.
३) कढल्यात तेल गरम करून त्यात जिरे आणि हिंग घालून फोडणी करावी. हि फोडणी रायत्यावर घालावी. मिक्स करावे.
जेवणात तोंडीलावणी म्हणून मुळ्याचे रायते छान लागते.

टीप:
१) जर फोडणी घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल. फक्त जिरेपूड नक्की घालावी.

Thursday, 2 February 2012

वांग्याचे भरीत - Vangyache Bharit

Baingan Bhurta in English

वेळ: ३० मिनिटे
३ ते ४ जणांसाठी
vangyache bharit, baingan bharta, bhurta recipe, eggplant bhurtaसाहित्य:
१ मोठे वांगे (साधारण १ पौंड)
२ मध्यम कांदे, बारीक चिरून
१ मोठा टोमॅटो, बारीक चिरून
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या,
३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) वांगे भाजून घ्यावे.
२) वांगे गार होवू द्यावे. वांगे सोलून आतील गर बाजूला काढावा आणि सुरीने रफली चिरावे.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली लसूण घालून १०-१५ सेकंद परतावे.
४) कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावे. कांदा छान परतला गेला कि टोमॅटो घालून एकदम मऊ होईस्तोवर परतावे.
५) मीठ आणि सोललेले वांगे घालून व्यवस्थित मिक्स करावे. तळापासून परतावे म्हणजे तळाला वांगे चिकटून जाळणार नाही. कडेने तेल सुटेस्तोवर परत राहावे (साधारण ५ ते ८ मिनिटे)
गरम भरीत भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.

Tuesday, 22 November 2011

भेंडीचे रायते - Bhindi Raita

Bhindi Raita in English

वेळ: ५ ते ७ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी

bhendiche bharit, bhendiche raite, bhindi raita, bhinid bhurtaसाहित्य:
१० ते १२ मध्यम भेंडी
२ हिरव्या मिरच्या
१/४ ते १/२ कप दही
चवीपुरते मीठ
१ टीस्पून तेल
चिमूटभर हिंग
१/२ टीस्पून जिरे
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून

कृती:
१) भेंडीची दोन्ही देठं कापावीत. आणि भेंडीचे मध्यम तुकडे करावे.
२) भेंडी आणि हिरव्या मिरच्या एकत्र प्रेशरकुकरमध्ये २ शिट्या करून वाफवून घ्याव्यात.
३) वाफ जिरल्यावर भेंडी बाहेर काढून हाताने कुस्करून घ्यावी. मीठ घालावे.
४) लहान कढल्यात तेल गरम करून जिरे आणि हिंग घालून फोडणी तयार करावी. कुस्करलेल्या भेंडीवर घालावी. चमच्याने मिक्स करावे.
५) भेंडी गार झाल्यावर दही आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.

भेंडीचे रायते जेवणात तोंडीलावणी म्हणून घ्यावे.

टीपा:
१) मिश्रण गरम असताना दही घालू नये. उष्णतेमुळे दही फुटते.

Friday, 9 September 2011

दह्यातील वांग्याचे भरीत - Vangyache Bharit

Baigan Bhurta (in yogurt) in English

वेळ: १० मिनिटे
साधारण १ कप भरीत
vangyache bharit, baingan bharta, baingan bhurta, dahyatil vangyache bharitसाहित्य:
१ कप भाजलेल्या वांग्याचा गर
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून तेल, १ चिमटी मोहोरी (ऐच्छिक) , २ चिमटी जिरे, १/४ टीस्पून हिंग
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
२ ते ३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
३/४ कप किंवा गरजेनुसार दही
चवीपुरते मीठ

कृती:
१) वांग्याचा गर सुरीने थोडा कापून घ्यावा. कढल्यात तेल गरम करावे. त्यात जिरे घालून तडतडेस्तोवर थांबावे. हिंग आणि हिरवी मिरची घालावी. तयार फोडणी वांग्यावर घालावी.
२) कांदा आणि मीठ घालून मिक्स करावे. दही आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
जेवणात तोंडीलावणी म्हणून दह्यातील वांग्याचे भरीत छान लागते.

Tuesday, 5 July 2011

केळ्याचे रायते - Kelyache Raite

Banana Raita in English

४ जणांसाठी
वेळ: १० मिनिटे

banana recipes, Banana Raita, Kelyache raite, condiment recipesसाहित्य:
२ मध्यम केळी, जरा जास्त पिकलेली
१/२ कप दही, घुसळलेले
१ हिरवी मिरचीची पेस्ट (किंवा चवीनुसार)
१ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ टिस्पून मोहोरी पावडर
१ टिस्पून साखर किंव चवीनुसार
चवीनुसार मिठ

कृती:
१) केळं सोलून घ्यावी आणि त्याचे मध्यम तुकडे करावे
२) दह्यामध्ये १ ते २ चमचे पाणी घालून थोडे घोटून घ्यावे.
३) कोथिंबीर आणि थोडे मिठ एकत्र करून हाताने चुरडून घ्यावे. आणि दह्यात मिक्स करावे
४) दह्यात मोहोरी पावडर, साखर, मिरची पेस्ट, चुरडलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे. आता चिरलेले केळं घालून मिक्स करावे.
जेवताना तोंडीलावणी म्हणून हे रायते सर्व्ह करता येते.

Tuesday, 28 June 2011

काकडीचा कायरस - Kakdicha Kayras

Kakdi Kayras in English

वेळ: १० ते १५ मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

cucumber salad, kakdicha kayras, kakdichi koshimbiसाहित्य:
१ कप बारीक चिरलेली काकडी (सोलून)
१ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
३ ते ४ टेस्पून किसलेला गूळ किंवा चवीनुसार
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट (थोडा भरडसर)
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/८ टिस्पून जिरे, २ चिमटी हिंग, १/८ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मिठ

कृती:
१) चिंचेचा कोळ एका मध्यम वाडग्यात घ्यावा. त्यात साधारण १/२ कप पाणी घालून मिक्स करावे. मिठ, गूळ घालून गूळ विरघळेस्तोवर मिक्स करावे. (पाण्याची चव आंबटगोड असली पाहिजे, त्यानुसार चिंच किंवा गूळ आवडीनुसार वाढवावा)
२) चिंचेच्या पाण्यात काकडी घालावी. मिश्रण पातळसरच असावे, तेव्हा लागल्यास अजून थोडे पाणी घालावे. दाण्याचा कूटही घालावा.
३) कढल्यात तेल गरम करावे. जिरे, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. हि फोडणी कायरसावर घालावी. कोथिंबीर घालून मिक्स करावे.
काकडी कायरस जेवणात तोंडीलावणी म्हणून घ्यावे.

टीप:
१) आवडीनुसार चिंचेचा कोळ किंवा गूळ कमी जास्त करू शकतो.

Wednesday, 1 June 2011

दह्यातील काकडी कोशिंबीर - Cucumber Yogurt Raita

Cucumber Raita in English

वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: १० मिनीटे

cucumber raita, kakdichi koshimbir, dahyatil kakdi koshimbir, Indian raita, biryaniसाहित्य:
१ कप बारीक चोचवलेली काकडी (आधी काकडी सोलावी)
३/४ कप दही, घोटून
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१ टिस्पून तूप
२ चिमटी जिरे
चवीपुरते मिठ

कृती:
१) चोचवलेली काकडी आणि दही एकत्र करावे. मिरची आणि थोडेसे मिठ एकत्र करून चुरडावे आणि दही-काकडीमध्ये घालावे.
२) लहान कढल्यात तूप गरम करून जिरे फोडणीस घालावे. जिरे तडतडले कि दही-काकडीत घालावे.
३) कोथिंबीर आणि लागल्यास मिठ घालून मिक्स करावे.
हे रायते रोजच्या जेवणात तोंडीलावणी म्हणून छान लागते.

टीपा:
१) रायते अजून तिखट हवे असल्यास अजून थोडी मिरची चुरडून घालावी.
२) सर्व दही एकदम काकडीत घालू नये. थोडे घालून मिक्स करून लागेल तसे दही घालावे. जर तुम्हाला जास्त दही हवे असेल तर अजून दही घातले तरीही चालेल.
३) १ ते २ टेस्पून दाण्याचा कूटही घालू शकतो.

Tuesday, 29 March 2011

कैरीचे रायते - Kairiche Raite

Kairi Raita in English

वेळ: १० मिनीटे
साधारण १ कप

साहित्य:
१ कप कैरीचा गर (कृती - स्टेप १)
१/२ कप गूळ
१/२ टिस्पून लाल तिखट
चवीपुरते मिठ
१ टिस्पून तेल
२ कढीपत्त पाने
१/४ टिस्पून जिरे
चिमूटभर हिंग
१ लाल मिरची

कृती:
१) कूकरमध्ये १ कप पाणी घालावे. कूकरच्या डब्यात पाणी न घालता आख्खी कैरी ठेवावी. २ ते ३ शिट्ट्या करून कैरी वाफवून घ्यावी. कूकरची वाफ जिरली कि लगेच कैरी बाहेर काढून गरम असतानाच त्यातील गर काढून घ्यावा.
२) या गरामध्ये गूळ कुस्करून घालावा.
३) या मिश्रणात लाल तिखट आणि चवीपुरते मिठ घालावे. तेल, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि लाल मिरची घालून फोडणी करावी. हि फोडणी कैरीच्या गरावर घालावी.
सर्व निट मिक्स करून जेवणात तोंडीलावणी घ्यावे.

टीप:
१) आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमीजास्त करावे.

Tuesday, 12 October 2010

सफरचंद डाळींब रायता - Apple Pomegranate Raita

Apple Pomegranate Raita in English

४ ते ६ जणांसाठी
वेळ: १० ते १५ मिनीटे

साहित्य:
१ कप डाळींबाचे दाणे
१ कप बारीक चिरलेले लाल सफरचंद (टीप)
१/२ कप दही
१ टेस्पून दूध
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
१ टिस्पून साखर
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मिठ

कृती:
१) दही आणि दूध एकत्र घोटून घ्यावे. लागल्यास एखादा चमचा दूध घालावे. यामध्ये बारीक चिरलेले सफरचंद घालून मिक्स करावे.
२) आता डाळींबाचे दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर आणि मिठ घालून व्यवस्थित मिक्स करावे. तासभर फ्रिजमध्ये गार करावे. जेवणामध्ये तोंडीलावणी म्हणून सर्व्ह करावे.

टीप:
१) सफरचंद आधीच कापून ठेवू नये, काळे पडते. दही घोटल्यावर मग सफरचंद चिरायला घ्यावे आणि थोडे चिरून झाले कि दह्यात घालावे, म्हणजे सफरचंद काळे पडणार नाही.