Pages

Wednesday, 5 December 2012

घोसाळे भजी - Ghosale Bhajji



वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
साहित्य:
१ घोसाळे (१० इंच)
३/४ कप बेसन
१/२ ते ३/४ कप पाणी
१/४ टीस्पून ओवा
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
४ लसणीच्या पाकळ्या, ठेचून (ऐच्छिक)
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) घोसाळे धुवून पुसून घ्यावे. सोलून त्याच्या दीड सेमीच्या चकत्या कराव्यात
२) बेसन, ओवा, लाल तिखट, हळद, लसूण, मीठ, कोथिंबीर आणि पाणी घालून पीठ भिजवावे. पीठ घट्ट किंवा पातळ नसावे. मध्यमसर भिजवावे. कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले कि त्यातील १ चमचा तेल भिजवलेल्या पिठात घालावे.
३) कढईखालचा गॅस मध्यम करावा. घोसाळ्याचे तुकडे पिठात बुडवून तेलात टाकावेत. दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. गरम खायला द्यावे.

टीप:
१) लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरचीची पेस्टही वापरता येईल.

0 comments:

Post a Comment