Pages

Tuesday, 11 December 2012

आवळ्याचे लोणचे - Amla Pickle


वेळ: १५मिनिटे
१  कप लोणचे

साहित्य:
६ ते ७ आवळे
२ टेस्पून लोणच्याचा मसाला (मी केप्रचा मसाला वापरला होता.)
१ टीस्पून लाल तिखट
४ टेस्पून तेल
१/२ टीस्पून मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद
१ टेस्पून मीठ

कृती:
१) आवळे धुवून स्वच्छ पुसावेत. त्याच्या पातळ कापट्या कराव्यात (एका आवळ्याच्या साधारण १२ ते १५ कापट्या). या कापट्या एका काचेच्या भांड्यात घ्यावे. त्यात लोणचे मसाला, मीठ आणि लाल तिखट घालावे. २ तास मसाला मुरू द्यावा.
३) कढल्यात तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. ही फोडणी एका वाटीत काढावी.
४) फोडणी थंड झाल्यावर ही लोणच्यात घालावी. मिक्स करून काचेच्या किंवा प्लास्टिकच्या स्वच्छ आणि कोरड्या बरणीत भरावे.

टिप्स:
१) काही आठवड्यांनी लोणच्याचा रंग थोडा काळपट होतो, चवीत फरक पडत नाही. यासाठी लोणचे केल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे.

0 comments:

Post a Comment