Pages

Showing posts with label Chutney. Show all posts
Showing posts with label Chutney. Show all posts

Thursday, 21 June 2012

तिळकूट - Tilkut



वेळ: २५ मिनिटे
साधारण १ ते दीड कप चटणी
sesame chutney, tasty tilkut, spicy sesame chutney, black semame chutney, dry chutney, Indian Grocery, weight loss

साहित्य:
१ कप कारळे तिळ
१/४ कप भाजलेले शेंगदाणे
१ चमचा लाल तिखट
१ वाटी कोरडा कढीपत्ता
चवीपुरते मिठ
१ चमचा गूळ
१ चमचा चिंच
१/४ कप किसलेले खोबरे

कृती:१) प्रथम तिळ ३-४ मिनीटे कोरडेच भाजून घ्यावे. किसलेले खोबरे खरपूस भाजून घ्यावे. भाजलेल्या शेंगदाण्यांची साले काढून टाकावी. कढीपत्ता उन्हात न वाळवता सावलीत वाळवावेत व नंतर तवा थोडा गरम करून कढीपत्ता थोडा शेकवून घ्यावा म्हणजे तिळकूट टिकाऊ बनते.
२) भाजलेले कारळे तिळ, १/४ कप भाजलेले शेंगदाणे, १/४ कप भाजलेले खोबरे, १ चमचा लाल तिखट, १ वाटी कोरडा कढीपत्ता, १ चमचा गूळ, १ चमचा चिंच आणि चवीपुरते मिठ एकत्र कुटून घ्यावे किंवा मिक्सरवर बारीक करून घ्यावे.

Tuesday, 21 June 2011

लसूण चटणी - Garlic Chutney

Garlic Chutney in English

वेळ: १० मिनिटे
साधारण १/२ कप चटणी

साहित्य:
१० मोठ्या लसूण पाकळ्या किंवा १ मध्यम लसणीचा गड्डा
चवीपुरते मीठ (साधारण १/२ टीस्पून)
४ ते ५ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट (भरड)
१/२ टीस्पून आमचूर पावडर
१ टीस्पून लाल तिखट
२ टेस्पून तेल

कृती:
१) लसूण सोलून चिरून घ्यावी. खलबत्ता तयार ठेवावा. त्यात १ टीस्पून लाल तिखट घालून ठेवावे.
२) फोडणीसाठी लहान कढले घेऊन त्यात तेल गरम करावे. तेलात लसूण घालून लसूण थोडी ब्राऊन होईस्तोवर परतावी. हि फोडणी लाल तिखटावर घालावी आणि चमच्याने ढवळावे. (टीप १)
३) या मिश्रणात मीठ, शेंगदाणे कूट, आमचूर पावडर घालावी आणि चांगले कुटून काढावे.
हि चटणी पराठा, डोसा, किंवा नेहमीच्या जेवणात तोंडीलावणी म्हणून खाऊ शकतो.

टीप:
१) लाल तिखट फोडणीत घालू नये कारण तेल आणि कढले दोन्ही गरम असल्याने लाल तिखट करपण्याची शक्यता असते. म्हणून लाल तिखट खलबत्त्यात घालून त्यावर तेल ओतावे.

Tuesday, 20 April 2010

खजूर चटणी - Dates Chutney

Dates Chutney in English

साधारण १ कप चटणी
वेळ: १० मिनीटे

Date Chutney sweet and sour chutney, tamarind chutney, sweet chutney
साहित्य:
१५० ग्राम खजूर (pitted baking dates) (टीप १)
लिंबाएवढा चिंचेचा गोळा (बिया काढून)
१/४ कप किसलेला गूळ (ऐच्छिक) (टीप २)
१ हिरवी मिरची किंवा १/४ चमचा लाल तिखट
४ ते ५ पुदीना पाने
१ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून जिरेपूड
२ चिमटी काळे मिठ
चिमूटभर साधं मिठ

कृती:
१) चिंच, १/२ कप गरम पाण्यात भिजवून ठेवावी. किंवा १/२ कप पाणी उकळावे. पाणी उकळले कि गॅस बंद करावा. त्यात चिंच भिजवून ठेवावी आणि वरून झाकण ठेवून १/२ तास तसेच ठेवावे.
२) चिंचेचे पाणी कोमट झाले कि मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. बारीक गाळण्याने व्यवस्थित गाळून घ्यावे आणि चोथा वेगळा करावा.
३) मी बिया काढलेले आणि अगोदरच मॅश केलेले खजूर वापरले होते. यामध्ये काही चमचे पाणी घालून हातानेच मॅश करावे.
४) मिक्सरमध्ये हिरवी मिरची, पुदीना, मॅश केलेला खजूर, चिंचेचा कोळ, गूळ, धणे-जिरेपूड, काळं मिठ, आणि साधं मिठ घालावे. सर्व एकत्र मिक्सरवर बारीक करावे.
हि चटणी चाट पदार्थांबरोबर, समोसा किंवा भज्यांबरोबर खुप चविष्ट लागतो. - चाट पदार्थांच्या रेसिपीजसाठी इथे क्लिक करा.

टीप:
१) जर तुम्ही साधे खजूर वापरणार असाल तर साधारण १३ ते १५ खजूर वापरावे. आधी त्यातील बिया काढून टाका. नंतर अगदी थोड्या कोमट पाण्यात साधारण दिड-दोन तास भिजवून ठेवावेत. पाणी बाजूला काढावे आणि खजूर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. वाटताना बाजूला काढलेल्या पाण्यातील थोडेसेच पाणी वापरावे.
२) कधीकधी खजूराचा गोडपणा चटणीला तेवढा गोडपणा देत नाही. या चटणीत गोडपणा वाढवण्यासाठी मी यात गूळ वापरला आहे. त्यामुळे गूळ घालण्याच्या आधी चव पाहावी आणि गरज वाटल्यासच गूळ घालावा. तसेच गूळाऐवजी साखरही वापरू शकतो.

Labels:
Tamarind Chutney, Sweet and sour chutney, dates chutney, Khajoor Chutney, Mithi chutney.