Pages

Showing posts with label Thin Soup. Show all posts
Showing posts with label Thin Soup. Show all posts

Tuesday, 14 February 2012

फोडणीचे ताक - Fodaniche Tak

Fodniche taak in English

वेळ: ५ मिनिटे
वाढणी: २ कप

साहित्य:
२ कप ताक
१/२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून हिंग
१ सेमी आल्याचा तुकडा, ठेचून
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१ आमसुलं (ऐच्छिक)
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मिठ

कृती:
१) तयार ताक एका पातेल्यात काढून ठेवावे.
२) छोट्या कढल्यात तूप गरम करावे. जिरे, हिंग, मिरच्या आणि आल्याचा तुकडा घालून फोडणी करावी. कोथिंबीरही फोडणीतच घालावी. ताकामध्ये हि फोडणी घालून मिक्स करावे. चवीनुसार मिठ घालावे.
३) जर ताक आंबट नसेल तर आमसुल, २-३ चमचे गरम पाण्यात थोडावेळ भिजत ठेवावे आणि हे आंबट पाणी ताकात घालावे.
४) हे ताक गरम केले नाही तरीही चालते. पण गार ताक प्यायचे नसेल तर अगदी मंद आचेवर किंचित कोमट करावे. खुप गरम करू नये नाहीतर ताक फुटते.
जेवताना हे ताक मधेमधे प्यायला तसेच मुगतांदुळाच्या खिचडीबरोबरही हे ताक छान लागते.

टीप:
१) ताक जर आंबट असेल तर आमसूल घालू नये.

Tuesday, 16 August 2011

टोमॅटो रसम - Tomato Rasam

Tomato Rasam in English

वेळ: ४० ते ५० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

rasam soup, tomato rasam, lemon rasam, garlic rasam, rassam recipeसाहित्य:
३ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
१/४ कप तूर डाळ
२ ते ३ कप साधं पाणी
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ ते ३ चिमटी मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/८ टीस्पून हळद, २ सुक्या लाल मिरच्या, १/२ टीस्पून उडीद डाळ, १५ ते २० मेथी दाणे, २ लसणीच्या पाकळ्या (ठेचून,), १ डहाळी कढीपत्ता
१० ते १२ मिरी दाणे, भरडसर ठेचून
१ हिरवी मिरची, चिरून
दीड टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
२ टीस्पून चिंच
चवीपुरते मीठ

कृती:
१) प्रेशर कुकरमध्ये तूर डाळ २ कप पाणी घालून शिजवून घ्यावी. डाळ शिजली कि त्यातील पाणी काढून घ्यावे. डाळ चेपून जेवढे शक्य तेवढे पाणी काढावे.
२) १/२ कप गरम पाणी घ्यावे त्यात चिंच भिजत ठेवावी. १० मिनीटांनी चिंचेचा कोळ काढून घ्यावा.
३) २ कप साधं पाणी आणि २ कप डाळीचे पाणी एकत्र पातेल्यात उकळण्यास ठेवावे. उकळी फुटली कि टोमॅटो घालून किमान २० मिनिटे किंवा टोमॅटो नरम होईस्तोवर मध्यम आचेवर उकळू द्यावे. हिरवी मिरची आणि १/२ चिंचेचा कोळही घालावा.
४) छोट्या कढल्यात तेल गरम करावे. उडीद डाळ, मेथी दाणे घालावेत. रंग गुलाबीसर होईस्तोवर थांबावे. नंतर लसूण आणि लाल मिरच्या घालाव्यात. ५-७ सेकंदानी मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालावा. ५-७ सेकंदानी ही फोडणी रस्सम वर घालावी.
५) मीठ, कुटलेली मिरी, धने-जिरेपूड घालून मिक्स करावे. १०-१५ मिनिटे उकळवावे.
चव पाहून जिन्नस (तिखट, मीठ, चिंच ) अड्जस्ट करावे.

रसम भाताबरोबर किंवा नुसते सुपसारखे प्यायलाही छान लागते.

टीप:
१) छान पिकलेले, लालबुंद टोमॅटो वापरावेत.
२) जर टोमॅटोचे बारीक तुकडे रसममध्ये आवडत नसतील तर तोमतो चीरण्याऐवजी प्युरी करावी.
३) रसम थोडे स्पाईसीच असते. पण थोडे कमी तिखट हवे असल्यास मिरीचे प्रमाण कमी करावे.
४) जर रसम थोडे आधी करून ठेवले तर चांगले मुरते आणि चवीला छान लागते.

Wednesday, 29 September 2010

कैरीचे सार - Kairiche Saar

Raw Mango Soup in English

वाढणी: ४ जणांसाठी
वेळ: २० मिनीटे

green mango soup, raw mango soup, kairiche saar, kairiche sarसाहित्य:
१ मोठी कैरी
गूळ (टीप)
१ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
२ चिमूटभर हिंग
३ ते ४ कढीपत्ता पाने
२ हिरव्या मिरच्या, ठेचून घ्याव्यात
१/४ कप कोथिंबीर
चवीपुरते मिठ

कृती:
१) कैरी कूकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावी. कूकरची वाफ जिरल्यावर वाफवलेली कैरी बाहेर काढून कोमटसर असतानाच सोलून घ्यावी. नंतर आतील गर घट्ट असेल तर किसून घ्यावा.
२) जेवढा गर असेल तेवढा गूळ घालावा (किंचीत कमी चालेल). हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करावे. कैरीच्या गराला दोरे असतील तर गर गाळून घ्यावा.
३) कढईत तूप, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मिरचीचा ठेचा घालून फोडणी करावी. त्यामध्ये कैरीचा गर घालून गरजेइतपत पाणी घालावे. मिठ घालून उकळी काढावी.
उकळी काढून झाल्यावर चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावे.
हे कैरीचे सार गरमागरम तूप-भाताबरोबर छान लागते. तसेच नुसते प्यायलाही मस्तच!!

टीप:
१) कैरीला आंबटपणा कमी असेल तर गूळाचे प्रमाण कमी करावे.

Labels:
Green Mango Soup, Sweet and sour mango soup, Kairiche saar