Pages

Showing posts with label Eggplant. Show all posts
Showing posts with label Eggplant. Show all posts

Thursday, 2 February 2012

वांग्याचे भरीत - Vangyache Bharit

Baingan Bhurta in English

वेळ: ३० मिनिटे
३ ते ४ जणांसाठी
vangyache bharit, baingan bharta, bhurta recipe, eggplant bhurtaसाहित्य:
१ मोठे वांगे (साधारण १ पौंड)
२ मध्यम कांदे, बारीक चिरून
१ मोठा टोमॅटो, बारीक चिरून
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या,
३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) वांगे भाजून घ्यावे.
२) वांगे गार होवू द्यावे. वांगे सोलून आतील गर बाजूला काढावा आणि सुरीने रफली चिरावे.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली लसूण घालून १०-१५ सेकंद परतावे.
४) कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावे. कांदा छान परतला गेला कि टोमॅटो घालून एकदम मऊ होईस्तोवर परतावे.
५) मीठ आणि सोललेले वांगे घालून व्यवस्थित मिक्स करावे. तळापासून परतावे म्हणजे तळाला वांगे चिकटून जाळणार नाही. कडेने तेल सुटेस्तोवर परत राहावे (साधारण ५ ते ८ मिनिटे)
गरम भरीत भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.

Thursday, 1 December 2011

How to roast an Eggplant

i) over stove top:- If you have gas burner, rub little oil to eggplant and roast it on the flame. Turn it occasionally. (Note- Eggplant releases water after roasting, so it may leave stains on the burner. But those stains can be removed by scrubbing)

ii) in the Oven:- Preheat the oven at 450 F. Apply some oil all over the eggplant. Poke the eggplant a few times with a fork. Wrap it with aluminum foil. Put it in a baking tray and bake for 45 to 50 minutes. (It does cook the eggplant, but does not give smokey flavor)

iii) Use the barbecue grill to roast eggplant.

iv) in Fireplace (Tip) - Funny to hear but I actually roasted the eggplant in fireplace :). Apply some oil all over the eggplant. Poke the eggplant a few times with a fork. Wrap it with aluminum foil. Open the exhaust before starting fire. Now stack 2-3 logs in fireplace. Put 1 or 2 coconut shells at the bottom. Sprinkle 2 spoons oil over the logs. Place the eggplant in between so that it gets roasted evenly. Light the fire with some newspapers. After fire kicks up perfectly, eggplant will get roasted within 10 to 15 minutes. Remove the eggplant very carefully by using tong. BE CAREFUL WHILE USING THIS METHOD and taking the roasted eggplant out.

Tip:
1) I did not use 'starter fire logs' which are available in super markets, as I wasn't sure of what things and chemicals have been used to make them workable. It is better to use naturally fallen twigs.

Related Recipes
Baingan Bhurta
Baingan Bhurta in Yogurt
Tamarind flavored Baingan Bhurta

======================================================

i) गॅसवर: गॅसच्या शेगडीवर वांगं भाजण्यासाठी आधी वांग्याला किंचीत तेल चोळून घ्यावे आणि मध्यम किवा मोठ्या आचेवर भाजावे. मधेमधे वांगं फिरवावे म्हणजे सर्व ठिकाणी वांगं निट भाजले जाईल. (नोट- गॅसवर वांगं भाजताना वांग्यातील पाणी शेगडीवर पडून डाग पडतात. पण थोडे घासून स्वच्छ करता येते.)
ii) ओव्हनमध्ये: ओव्हन ४५० F वर प्रिहीट करावे. वांग्याला बाहेरून तेल लावून सुरीने किंवा काट्याने (Fork) काहीवेळा टोचावे. अल्युमिनीयम फॉइलमध्ये गुंडाळून ४५ ते ५० मिनीटे बेक करावे. (या पद्धतीने वांग्याचा आतील गर शिजतो पण थेट विस्तवावर भाजल्याने जो खमंग स्वाद येतो तो मात्र येत नाही.)

iii) बार्बेक्यु ग्रिलसुद्धा वांगं भाजायला वापरू शकतो.

iv) फायरप्लेस (टीप): ऐकायला मजेशीर वाटेल पण मी वांगं फायरप्लेसमध्ये भाजलं. वांग्याला तेल लावून काहीवेळा सुरीने किंवा काट्याने टोचून घ्यावे. अल्युमिनीयम फॉइलमध्ये व्यवस्थित घट्ट गुंडाळून घ्यावे. फायरप्लेसमध्ये वरच्या बाजूस धूर बाहेर जाण्यासाठी छोटी खिडकी असते ती प्रथम उघडावी. नंतर २ ते ३ जाडसर फांद्या फायरप्लेसमध्ये रचाव्यात. खाली १-२ नारळाच्या करवंट्या ठेवाव्यात. १-२ चमचे तेल फांद्यांवर शिंपडावे. जागा करून मधल्या जागी वांगं ठेवावे. आग पेटवावी. लागल्यास पेपर किंवा कार्डबोर्डचे तुकडे वापरून आग सुरू करावी. शेकोटी व्यवस्थित पेटल्यावर १० ते १५ मिनीटात वांग भाजलं जातं. वांगं भाजलं गेल्यावर अगदी सांभाळून पापड तळायच्या चिमट्याने बाहेर काढावे.

टीप:
१) वांगं भाजण्यासाठी बाजारात जो फायर स्टार्टर लॉग मिळतो तो वापरला नव्हता कारण तो बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा रसायनं वापरतात ते माहीत नसतं. म्हणून झाडाच्या तुटलेल्या फांद्याच वापरल्या होत्या.

दह्यातील वांग्याचे भरीत
वांग्याचे भरीत
चिंचकोळाचे वांग्याचे भरीत

Friday, 9 September 2011

दह्यातील वांग्याचे भरीत - Vangyache Bharit

Baigan Bhurta (in yogurt) in English

वेळ: १० मिनिटे
साधारण १ कप भरीत
vangyache bharit, baingan bharta, baingan bhurta, dahyatil vangyache bharitसाहित्य:
१ कप भाजलेल्या वांग्याचा गर
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून तेल, १ चिमटी मोहोरी (ऐच्छिक) , २ चिमटी जिरे, १/४ टीस्पून हिंग
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
२ ते ३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
३/४ कप किंवा गरजेनुसार दही
चवीपुरते मीठ

कृती:
१) वांग्याचा गर सुरीने थोडा कापून घ्यावा. कढल्यात तेल गरम करावे. त्यात जिरे घालून तडतडेस्तोवर थांबावे. हिंग आणि हिरवी मिरची घालावी. तयार फोडणी वांग्यावर घालावी.
२) कांदा आणि मीठ घालून मिक्स करावे. दही आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
जेवणात तोंडीलावणी म्हणून दह्यातील वांग्याचे भरीत छान लागते.

Tuesday, 6 September 2011

मसाला वांगी - Masala Vangi

Spicy Eggplant Curry in English

वेळ: ४० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

masala baingan, baingan recipes, eggplant recipes, masala vangi, vangyachee bhajiसाहित्य:
१० लहान वांगी
मसाला पेस्टसाठी:-
१ कप कांदा, पातळ उभा चिरलेला
१ मध्यम टोमॅटो, चिरलेला
५ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ इंच आलं, बारीक चिरून
५ कढीपत्त्याची पाने
१ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
४ हिरव्या मिरच्या, चिरून
२ टेस्पून खवलेला ताजा नारळ
१/२ टिस्पून खसखस, भाजून पूड केलेली (ऐच्छिक)
१/२ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून गरम मसाला
चवीपुरते मिठ
३ टेस्पून तेल
इतर साहित्य:-
२ टिस्पून तेल
५ ते ६ मेथीचे दाणे
१/४ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट (लालसर रंग येण्यासाठी)
२ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ

कृती:
१) वांग्याचे देठ कापून प्रत्येक वांग्याच्या ६ ते ८ फोडी कराव्यात.
२) मसाला पेस्ट
i) पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, लसूण, आणि आलं घालावे. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावे.
ii) टोमॅटो घालून ते एकदम मऊसर होईस्तोवर परतावे.
iii) दाण्याचा कूट, नारळ, धणे-जिरेपूड, खसखस, गरम मसाला आणि मिठ घालून मिक्स करावे.
iv) हे मिश्रण गार होवू द्यावे. थोडे पाणी घालून एकदम बारीक वाटून पेस्ट तयार करावी.
३) पॅनमध्ये तेल गरम करावे. मेथी दाणे घालून थोडा रंग बदलेस्तोवर थांबावे. नंतर हिंग, हळद, आणि वांग्याच्या फोडी घालाव्यात. थोडे मिठ घालावे. झाकण ठेवून फोडी थोडावेळ शिजू द्याव्यात. आता वाटलेला मसाला घालावा, चिंचेचा कोळ आणि लाल तिखट घालावे.
गरजेपुरते पाणी घालून कंसिस्टन्सी अड्जस्ट करावी. काही मिनीटे उकळी काढावी.
भात किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.

टीपा
१) जांभळ्या रंगाची लहान वांगी निवडावीत. तसेच साल तुकतूकीत आणि डागविरहीत असावे.
२) काश्मिरी लाल तिखटाला तिखटपणा अगदी कमी असतो पण यामुळे भाजीला रंग सुरेख येतो. वाटल्यास हे तिखट घातले नाही तरी चालेल.
३) या भाजीत थोडा गोडपणा चांगला लागतो. आवडत असल्यास थोडा गूळ किंवा साखर घालावी. (१/२ किंवा १ टिस्पून)

Tuesday, 2 August 2011

वांगी बटाटा काचऱ्या - Vangi Batata Kacharya

Aloo Baingan Stir Fry in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

aloo baingan, vangi batata kachrya,  batata kachrya, eggplant stir fry, healthy cookingसाहित्य:
८ ते १० लहान वांगी (टीप १)
२ मध्यम बटाटे
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट
४ ते ५ कढीपत्ता पाने
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून साखर किंवा चवीनुसार

कृती:
१) वांगी धुवून घ्यावीत आणि देठं कापून टाकावीत. प्रत्येक वांग्याच्या उभ्या चार फोडी कराव्यात. आणि चतकोर आकाराच्या काचऱ्या कराव्यात. गार पाण्यात बुडवून ठेवाव्यात.
२) बटाटे सोलून उभे चार भाग करून पातळ काचऱ्या कराव्यात.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. कांदा आणि बटाटा घालावा. थोडे मीठ घालावे. झाकण ठेवून बटाटे ५०% शिजवावे.
४) वांग्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. वांग्याच्या काचऱ्या कढईत घालाव्यात. झाकण न ठेवता वांगी परतत राहावी. वांगी पटकन शिजतात, म्हणून कढईवर झाकण ठेवू नये.
५) वांगी शिजली कि चव पाहून लागल्यास मीठ घालावे. आता शेंगदाण्याचा कूट, साखर, आणि नारळ घालून मिक्स करावे. एक दोन मिनिटे भाजी परतावी आणि गरमच पोळीबरोबर किंवा आमटी भाताबरोबर वाढावी.

टीपा:
१) मोठे वांगेसुद्धा वापरता येईल. तेव्हा वांगं-बटाट्याचे प्रमाण १ कप वांग्याच्या काचऱ्यांना ३/४ कप बटाट्याच्या काचऱ्या असे असावे.
२) आंबटपणासाठी १ टीस्पून लिंबाचा रस भाजी तयार झाल्यावर शेवटी घालावा.

Thursday, 24 March 2011

वांग्याचे भरीत - vangyache bharit

Baingan Bharta in English

वेळ: वांग भाजण्यासाठी: भाजण्याच्या पद्धतीनुसार । पाकृसाठी वेळ: ५ ते १० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

baingan bharta, vangyache bharit, eggplant recipe, roasted eggplant, roasted baingan bhurtaसाहित्य:
१ मोठे वांगे
१ मोठा कांदा, बारीक चिरून (साधारण ३/४ ते १ कप)
३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/८ टिस्पून हळद
चवीपुरते मिठ
कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) वांगं भाजून घ्यावं.
i) गॅसवर: गॅसच्या शेगडीवर वांगं भाजण्यासाठी आधी वांग्याला किंचीत तेल चोळून घ्यावे आणि आचेवर भाजावे. मधेमधे वांगं फिरवावे म्हणजे सर्व ठिकाणी वांगं निट भाजले जाईल. (नोट- गॅसवर वांगं भाजताना वांग्यातील पाणी शेगडीवर पडून डाग पडतात. पण थोडे घासून स्वच्छ करता येते.)
ii) ओव्हनमध्ये: ओव्हन ४०० F वर प्रिहीट करावे. वांग्याला बाहेरून तेल लावून सुरीने किंवा काट्याने (Fork) काहीवेळा टोचावे. अल्युमिनीयम फॉइलमध्ये गुंडाळून ४५ ते ५० मिनीटे बेक करावे. (या पद्धतीने वांग्याचा आतील गर शिजतो पण थेट विस्तवावर भाजल्याने जो स्वाद येतो तो मात्र येत नाही.)
iii) बार्बेक्यु ग्रिलसुद्धा वांगं भाजायला वापरू शकतो.
iv) फायरप्लेस (टीप): ऐकायला मजेशीर वाटेल पण मी वांगं फायरप्लेसमध्ये भाजलं. वांग्याला तेल लावून काहीवेळा सुरीने किंवा काट्याने टोचून घ्यावे. अल्युमिनीयम फॉइलमध्ये व्यवस्थित गुंडाळून घ्यावे. फायरप्लेसमध्ये वरच्या बाजूस धूर बाहेर जाण्यासाठी छोटी खिडकी असते ती प्रथम उघडावी. नंतर २ ते ३ जाडसर फांद्या फायरप्लेसमध्ये रचाव्यात. खाली १-२ नारळाच्या करवंट्या ठेवाव्यात. १-२ चमचे तेल फांद्यांवर शिंपडावे. जागा करून मधल्या जागी वांगं ठेवावे. आग पेटवावी. लागल्यास पेपर किंवा कार्डबोर्डचे तुकडे वापरून आग सुरू करावी. शेकोटी व्यवस्थित पेटल्यावर १० ते १५ मिनीटात वांग भाजलं जातं. वांगं भाजलं गेल्यावर अगदी सांभाळून पापड तळायच्या चिमट्याने बाहेर काढावे.

२) वांगं थोडं गार होवू द्यावं. सालं काढून शेंडी कापून टाकावी. आतील गर जाडसर कापून घ्यावा.
३) वांगं आणि कांदा एकत्र करावा. वांगं भाजल्यावर त्यातून जो रस निघतो तो फेकून देवू नये, तोही वापरावा.
४) कढईत तेल तापवून मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. मिरची परतावी. नंतर कांदा-वांग्याचे मिश्रण घालून २-३ मिनीटे परतावे. कोथिंबीरीने सजवून भाकरीबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) वांगं भाजण्यासाठी बाजारात जो फायर स्टार्टर लॉग मिळतो तो वापरला नव्हता कारण तो बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा रसायनं वापरतात ते माहीत नसतं. म्हणून झाडाच्या तुटलेल्या फांद्याच वापरल्या होत्या.