वेळ: ५ ते ७ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
१० ते १२ मध्यम भेंडी
२ हिरव्या मिरच्या
१/४ ते १/२ कप दही
चवीपुरते मीठ
१ टीस्पून तेल
चिमूटभर हिंग
१/२ टीस्पून जिरे
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
कृती:
१) भेंडीची दोन्ही देठं कापावीत. आणि भेंडीचे मध्यम तुकडे करावे.
२) भेंडी आणि हिरव्या मिरच्या एकत्र प्रेशरकुकरमध्ये २ शिट्या करून वाफवून घ्याव्यात.
३) वाफ जिरल्यावर भेंडी बाहेर काढून हाताने कुस्करून घ्यावी. मीठ घालावे.
४) लहान कढल्यात तेल गरम करून जिरे आणि हिंग घालून फोडणी तयार करावी. कुस्करलेल्या भेंडीवर घालावी. चमच्याने मिक्स करावे.
५) भेंडी गार झाल्यावर दही आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
भेंडीचे रायते जेवणात तोंडीलावणी म्हणून घ्यावे.
टीपा:
१) मिश्रण गरम असताना दही घालू नये. उष्णतेमुळे दही फुटते.
0 comments:
Post a Comment