Pages

Showing posts with label Chat. Show all posts
Showing posts with label Chat. Show all posts

Tuesday, 6 December 2011

रताळ्याचे चाट - Sweet Potato Chat

Sweet Potato Chat in English

वेळ: १५-२० मिनिटे
वाढणी: ४ ते ५ प्लेट

fasting recipes, ratalyache chat, ratale chat, sweet potato recipesसाहित्य:
१/२ किलो रताळी
१/२ कप हिरवी चटणी
१/२ कप चिंचेची आंबट-गोड चटणी
१ टीस्पून तूप
१ ते २ टीस्पून जिरेपूड
३/४ कप दही, (चमचाभर साखर घालावी)
१/२ कप बटाटा शेव किंवा बटाटा सळी
चवीपुरते मीठ किंवा सैंधव
१ टीस्पून लाल तिखट
बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) रताळी सोलून घ्यावीत आणि त्याचे दीड-दोन इंचाचे फिंगर चिप्स सारखे तुकडे करावेत. तुकडे खूप पातळ किंवा खूप जाड नसावेत, तसेच सर्व तुकडे साधारण एकसारख्या आकाराचे आणि जाडीचे असावेत.
२) नॉनस्टिक पॅनमध्ये १ टीस्पून तूप गरम करावे. त्यात रताळ्याचे तुकडे घालावे. चिमूटभर मीठ पेरावे आणि झाकण ठेवून ४-५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवावे. रताळी एकदम मऊ होईस्तोवर शिजवू नये. आतपर्यंत शिजली पाहिजेत आणि आकारात अख्खीही राहिली पाहिजेत. शक्यतो २ बॅचेस मध्ये रताळी शिजवावीत.
३) रताळी शिजली कि प्रत्येक सर्व्हिंग प्लेटमध्ये साधारण १/२ कप अशी वाढावीत. त्यावर एकेक चमचा हिरवी आणि गोड चटणी घालावी. वरती थोडे मीठ आणि जिरेपूड पेरावी. त्यावर दही घालावे. प्लेटच्या कडेने अजून थोडी हिरवी चटणी आणि गोड चटणी घालावी. वरून शोभेला लाल तिखट पेरावे. थोडी बटाटा शेव किंवा बटाटा सळी घालावी. कोथिंबीरीने सजवावे.
लगेच सर्व्ह करावे.

Monday, 23 August 2010

मसाला पाव - Masala Pav

Masala Pav in English

४ जणांसाठी (२ पाव प्रत्येकी)
वेळ: १५ मिनीटे

Indian street food, Chaat recipes, Pani puri, sev puri, pav bhaji, Restaurant style pav bhaji, Indian vegetarian snacks, vegetarian food, Indian curryसाहित्य:
पावभाजीचे मोठे पाव
४ टेस्पून अमूल बटर (१२ टिस्पून)
४ ते ६ टेस्पून मसाला - कृतीसाठी इथे क्लिक करा - कृतीमधील पहिल्या तीन स्टेप्स फॉलो करा
२ टेस्पून भोपळी मिरची, एकदम बारीक चिरून
किंचीत मिठ

कृती:
१) प्रत्येक पाव विलग करून घ्यावा. आणि वडापावसाठी कापतो तसा मधून आडवा कापावा. प्रत्येक पावाला थोडे बटर लावून घ्यावे.
२) तवा गरम करून त्यात १ टिस्पून बटर घालून त्यात १ टिस्पून बारीक चिरलेली भोपळी मिरची घालावी. काही सेकंद परतून साधारण चमचाभर मसाला घालावा. त्यावर लगेच कापलेला पाव उघडून भाजून घ्यावा.
३) अशाप्रकारे सर्व पाव भाजून घ्यावे.
सर्व्ह करताना कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि किंचीत टोमॅटो पेरून गरमा गरम पावभाजीबरोबर सर्व्ह करावे.

Labels:
Masala Pav, Masala pao, pav bhaji, Bombay Pav bhaji

Thursday, 6 May 2010

कॉर्न फ्लेक्स चाट - Corn Flakes Chaat

Corn Flakes Chat in English

४ सर्व्हिंग्ज
वेळ: १० मिनीटे (साहित्य तयार असल्यास)

diet chat recipe, healthy chat recipe, Indian Chat recipe, Pani puri, sevpuri, dahi batata puri, aloo chaatसाहित्य:
१ कप मोड आलेले हिरवे मूग (उकडलेले)
१/२ कप काबुली चणे (उकडलेले)
१ कप कॉर्न फ्लेक्स
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
३/४ कप दही, थोडे मिठ घालून घोटलेले
चिंचगूळाची चटणी आवडीनुसार (साधारण १/२ कप)
हिरवी चटणी आवडीनुसार (साधारण १/४ कप)

१ टिस्पून चाट मसाला (किंवा आवडीनुसार)
१ टिस्पून लाल तिखट (किंवा आवडीनुसार)
मिठ चवीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) जर तुम्ही ड्राय मूग आणि काबुलीचणे वापरणार असाल तर टीप १ पाहा.
२) सर्व्हींग प्लेटमध्ये १/४ कप हिरवे मूग आणि २ टेस्पून काबुली चणे पसरवावेत. त्यावर थोडे कॉर्न फ्लेक्स चुरून घालावेत. त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी चटणी घालावी. त्यावर फेटलेले दही आणि चिंचगूळाची चटणी घालावी. वरून चाटमसाला आणि लाल तिखट पेरावे. वरून चिरलेल्या कोथिंबीरीने सजवावे.
हे चाट लगेच खावे कॉर्न फ्लेक्स मऊ पडले कि चाट चांगले लागत नाही.

टीप:
१) मूग आणि काबुली चणे वेगवेगळे, साधारण ८ ते १० तास भिजवावेत. मूग आणि काबुली चणे शिजवताना कूकरच्या दोन वेगवेगळ्या डब्यात मूग आणि काबुली चणे ठेवावेत. फक्त कूकरमध्ये पाणी घालावे, कूकरच्या डब्यात पाणी घालू नये ज्यामुळे मूग आख्खे राहतात. मूग आणि चणे शिजताना थोडे मिठ घालावे.
२) यामध्ये चिंचगूळाच्या चटणीऐवजी खजूराची चटणीही वापरू शकता. त्या कृतीसाठी इथे क्लिक करा

Labels:
Chaat recipes, Indian Chaat food, Corn flakes chaat