
साहित्य:
१२ लिंबं (टीप १)
१ किलो साखर (४ मोठ्या वाट्या वरपर्यंत भरून)
१ वाटी मिठ
३/४ वाटी लाल तिखट
२ टिस्पून जिरेपूड
कृती:
१) लिंबं धुवून घ्यावीत. व्यवस्थित पुसून घ्यावी, पाणी राहू देवू नये. मध्यम आकाराच्या फोडी करून त्यातील बिया काढून टाकाव्यात. एका लिंबाच्या साधारण ८ ते १० फोडी कराव्यात.
२) फोडींना मिठ, तिखट, जिरेपूड लावून साधारण ८ दिवस स्वच्छ काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवावे.
पद्धत १
साखरेचा १ तारी पाक करावा (१ किलो साखरेला दिड वाटी पाणी). पाक गार करावा. त्या पातेल्यात ८ दिवस मुरवलेल्या लिंबाच्या फोडी घालव्यात. ढवळून बरणीत भरावे.
सर्व लोणचे बरणीत भरले कि बरणीच्या तोंडाशी १ मुठभर साखर घालून झाकण बंद करावे. लोणचे चांगले मुरायला ४-५ महिने लागतात.
पद्धत २
जर पाक करायचा नसेल तर नुसती साखर, ८ दिवस मुरवलेल्या लिंबाच्या फोडीत मिक्स करावी. बरणीत भरून ठेवावे. रोजच्या रोज बरणी उघडून, स्वच्छ व कोरड्या चमच्याने लोणचे ढवळावे. असे साखर पूर्ण विरघळेस्तोवर करावे.
टीप:
१) लिंबं पातळ सालीची घ्यावी. जर अमेरीकेत असाल तर पातळ सालीची लिंबं मिळत नाहीत. अशावेळी पाणी एकदम चांगले उकळवावे. गॅस बंद करून त्यात आख्खी लिंबं घालावीत आणि वर झाकण ठेवावे. पाणी गार झाले कि लिंबं व्यवस्थित पुसून घ्यावी आणि एकदोन तास वार्यावर ठेवावी म्हणजे पाणी पूर्ण निघून जाईल. मग वरच्या कृतीनेच लोणचे करावे.
0 comments:
Post a Comment