Pages

Showing posts with label Left Over. Show all posts
Showing posts with label Left Over. Show all posts

Tuesday, 2 October 2012

Idli Fry using leftover idlis

Idli Fry in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: दोन जणांसाठी
साहित्य:
१० मध्यम इडल्या (शक्यतो आदल्या दिवशीच्या उरलेल्या)
१ टेस्पून तेल
१/२ टीस्पून उडीद डाळ, २ चिमटी हिंग
३ लाल सुक्या मिरच्या
४ ते ५ कढीपत्ता पाने
किंचित मीठ (इडलीमध्ये ऑलरेडी मीठ आहे)

कृती:
१) इडल्यांचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यावे. मिरच्या दोन-दोन तुकडे करावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात आधी उडीद डाळ घालावी. रंग गुलाबीसर झाला कि त्यात हिंग, मिरच्या आणि कढीपत्ता घालावा.
३) आता इडलीचे तुकडे घालून मिक्स करावे. थोडे मीठ लागल्यास घालावे. इडल्या थोड्या लालसर होईस्तोवर परतावे.
कोथिंबीर घालून ब्रेकफास्ट म्हणून सर्व्ह करावे.

टीप:
१) इडलीचा आकार जर थोडा मोठा असेल तर तेलाचे प्रमाण थोडे वाढवावे लागेल.

Thursday, 8 December 2011

दही बुत्ती - Dahi Butti

Dahi Butti in English

वेळ: १५ मिनिटे
२ ते ३ जणांसाठी

dahi bhat, curd rice, dahi butti, rice recipes, leftover rice recipesसाहित्य:
३/४ कप तांदूळ
३/४ ते १ कप दही
१/४ ते १/२ कप दुध
१ टीस्पून तूप, ३-४ कढीपत्ता पाने, २ सुक्या लाल मिरच्या, १/४ टीस्पून उडीद डाळ, २ चिमटी जिरे, २ चिमटी हिंग, १/४ टीस्पून आले
चवीपुरते मीठ

कृती:
१) तांदूळ धुवून त्यात दीड ते दोन कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये भात शिजवून घ्यावा. मीठ घालू नये.
२) भात एका खोलगट वाडग्यात काढून घ्यावा. त्यात गार दुध घालावे. गार दुध घातल्याने भात लवकर थंड व्हायला मदत होते. मिश्रण गार झाले (अगदी किंचित कोमट असेल तरी चालेल) कि त्यात दही आणि मीठ घाला. गरम मिश्रणात दही घातल्यास उष्णतेमुळे दही फुटते.
३) कढल्यात तूप गरम करावे. त्यात आधी उडीद डाळ घालावी. गुलाबीसर झाली कि त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता, मिरच्या घालून फोडणी करावी. मिरच्या जर तुपात भिजत नसतील तर चमच्याने थोडा दाब द्यावा. आता गॅस बंद करावा आणि फोडणीत आले घालावे. मिक्स करून हि फोडणी दही-भातावर घालावी.
मिक्स करून सर्व्ह करावे.

टीपा:
१) आदल्या दिवशीचा भात वापरला तरीही चालतो. फक्त या भाताला कुकरमध्ये एक वाफ काढावी, शिट्टी करू नये. फक्त ५ मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी. आदल्या दिवशीच्या भाताची शिते थोडी तडतडीत होतात. अशा भाताची दही-बुत्ती चांगली लागत नाही.
२) या भातात थोडा गोडपणा देण्यासाठी १/२ टीस्पून साखर घालू शकतो.
३) दह्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकतो.

Tuesday, 27 September 2011

फोडणीचा पाव - phodanicha paav

Bread chi Usal in English

वेळ: १० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी

bread chi usal, pavachi usal, phodnicha bread, phodnicha pavसाहित्य:
१० ब्रेडचे स्लाईसेस
२ टेस्पून तेल
फोडणीसाठी: २ चिमटी मोहोरी, १ चिमटी हिंग, १/८ टीस्पून हळद, ४-५ कढीपत्ता पाने
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून (किंवा २ सुक्या लाल मिरच्या मोडून)
१/४ कप कांदा, बारीक चिरून
चवीपुरते मीठ आणि साखर
कोथिंबीर सजावटीसाठी
१ टीस्पून लिंबाचा रस

कृती:
१) ब्रेडच्या स्लाईसेसचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावे. किंवा हातानेच तुकडे करावे.
२) कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, हळद, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून परतावा.
३) कांदा परतताना मीठ घालावे आणि कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावा.
४) ब्रेडचे तुकडे घालून २ चिमटी साखर पेरावी.
५) झाकण ठेवून मिडीयम आचेवर २-३ मिनिटे वाफ काढावी.
लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गरमच सर्व्ह करावे.

टीपा:
१) ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरीही चालतो.

Tuesday, 18 May 2010

माणिकमोती - Manikmoti

Manikmoti in English
२ जणांसाठी
वेळ: १५ मिनीटे

leftover rice recipes, fodnicha bhat, fodnichi poli, fried rice, breakfast recipe, quick breakfast recipes, fried chapatiसाहित्य:
४ आदल्या दिवशीच्या पोळ्या (चपात्या)
१ कप शिजलेला भात (आदल्या दिवशीचा)
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/८ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट, ३-४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून शेंगदाणे
२ ते ३ टेस्पून मटार
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१ टिस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून साखर
सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोवलेला नारळ

कृती:
१) पोळ्यांचा हाताने कुस्कारा करून घ्यावा किंवा मिक्सरमध्ये भरडसर बारीक करावे. भात हाताने मोकळा करून घ्यावा.
२) कढईत तेल गरम करून आधी त्यात शेंगदाणे परतून घ्यावे. नंतर त्यातच मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता पाने घालून फोडणी करावी. त्यात कांदा आणि मटार घालून परतावे. अंदाजे मिठ घालावे.
३) कांदा निट परतला गेला गॅस मध्यम करून त्यात भात घालावा. निट मिक्स करून बारीक केलेल्या पोळ्या घालून निट परतावे. साखर घालून १ वाफ काढावी. लिंबाचा रस चवीनुसर घालावा.
कोथिंबीर आणि ओल्या खोबर्‍याने सजवावे. गरमागरम सर्व्ह करावे.

labels:
phodnicha bhat, phodnichi poli, fodani chi poli

Tuesday, 13 April 2010

फोडणीची पोळी - Phodnichi Poli

Phodanichi Poli in English

२ ते ३ जणांसाठी
वेळ: १५ मिनीटे

phodnichi poli, leftover chapati snack, quick breakfastसाहित्य:
७ ते ८ पोळ्या (आदल्या दिवशीच्या)
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, २ कढीपत्ता पाने
१/४ कप कांदा, बारीक चिरलेला
२ टेस्पून तळलेले शेंगदाणे
१/२ टिस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
२ चिमटी साखर
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) आदल्या दिवशीच्या पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्याव्यात.
२) कढईत २ टिस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालून परतावे. शेंगदाणे घालावे.
३) तयार फोडणीत मिक्सरमध्ये बारीक केलेल्या पोळ्या घालाव्यात आणि मध्यम आचेवर परतावे. मिठ आणि साखर घालून २ मिनीटे मंद आचेवर वाफ काढावी.
फोडणीची पोळी तयार झाली कि लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून घालून गरमच सर्व्ह करावे.

टीप:
१) जर पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करायची नसेल तर हातानेच बारीक तुकडे करूनही फोडणीस घालून शकतो.
२) फोडणीच्या पोळीबरोबर दही आणि लोणचे खुप छान लागते.
३) फोडणीची पोळी जर थोडी नरम पाहिजे असेल तर वाफ काढताना थोड्या ताकाचा हबका मारावा.
४) फोडणीमध्ये थोडे मटार घातल्यास फोडणीची पोळी छान लागते.

Labels:
Phodanichi poli, phodnichi poli, leftover chapati snack