वेळ: २५ ते ३० मिनिटे
२.२५ पौंड तूप (साधारण १ किलो तूप)
साहित्य:
३ पौंड अनसॉल्टेड बटर (मीठ विरहित)
कृती:
१) बटर रूम टेम्परेचरला येउ द्यात. बटर एका मोठ्या खोलगट अशा जाड बुडाच्या पातेल्यात घाला. मोठ्या आचेवर पातळ होवू द्यात आणि नंतर आच मिडीयम-हायच्या मध्ये ठेवा. तूप बनेस्तोवर पातेल्यावर लक्ष ठेवा, सुरुवातीला आच मोठी ठेवली असल्याने तूप उतू जावून अपघात होण्याची शक्यता असते. म्हणून मोठे खोलगट भांडे घ्यावे.
२) सुरुवातीला बटर वितळल्यावर बराच फेस दिसेल. हळूहळू फेस कमी होवू लागेल आणि तळाला सेटल होईल. (पूर्ण प्रोसेसला साधारण १५-२० मिनिटे लागतील.) (टीप १)
३) काही मिनीटांनी बुडबुडे पारदर्शक होतील. आणि बटरसुद्धा पारदर्शक होईल. असे झाले कि ४-५ मिनिटातच तूप तयार होईल. आता आच कमी करावी आणि तुपात थोडे पाण्याचे थेंब टाकावे. जर तूप चांगले कढवले गेले असेल तर पाणी पडताच तूप तडतडायला लागेल. म्हणजे तूप तयार झाले. जर तसे न घडल्यास आच मध्यम करावी. एक दोन मिनीटानी परत पाण्याचे थेंब घालून पहावे.
४) तूप कढवले गेले कि थोडेसे कोमट होवू द्यावे. आणि बारीक जाळीच्या मेटलच्या गाळण्याने गाळून घ्यावे. (प्लास्टिकचे गाळणे वापरू नये)
५) गाळल्यावर पातेले १० मिनिटे तिरके करून ठेवावे म्हणजे तूप ओघळून तळाला जमा होईल. हेही तूप वापरावे.
३ पौंड बटरमधून २.२५ पौंड तूप तयार होते. (१ किलो ३६० ग्राम बटरपासून साधारण १ किलो तूप मिळते.)
टीपा:
१) तूप कढवायला लागणारा वेळ हा कमी जास्त होवू शकतो. कारण जर बटर कमी घेतले किंवा आच मोठी ठेवली असेल तर तूप कमी वेळात होते.
२) तूप गरम असल्यास प्लास्टिकच्या गाळण्याने गाळले तर गाळणे वितळू शकते.
३) घरगुती लोण्यापासूनही तूप अशाच पद्धतीने बनवतात.
0 comments:
Post a Comment