४ ते ५ मध्यम पराठे
वेळ: ३० मिनिटे
साहित्य:
::::स्टफिंग::::
१ मध्यम ब्रोकोलीचा गड्डा
१ मध्यम कांदा, बारीक चिरून
२ टीस्पून लसूण पेस्ट
१ टीस्पून आलेपेस्ट
१ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून आमचूर पावडर
१ टीस्पून मिरची पेस्ट
चवीपुरते मीठ
::::कव्हर::::
१ कप गव्हाचे पीठ
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून जिरे
१/२ टीस्पून मीठ
१ टीस्पून तेल
::::इतर जिन्नस::::
१/४ कप तेल
कोरडे पीठ पराठे लाटताना
कृती:
१) प्रथम कणिक मळून घ्या. मिक्सिंग बोलमध्ये गव्हाचे पीठ, हळद, जिरे, मीठ आणि तेल घालून मिक्स करावे. पाणी घालून पीठ घट्टसर माळून घ्यावे.
२) ब्रोकोलीचे लहान तुरे करावेत. मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे. त्यात चिरलेला कांदा, आलेलसूण पेस्ट, गरम मसाला, मिरची पेस्ट, आमचूर पावडर आणि मीठ घालून मिक्स करावे.
३) ब्रोकोलीचे मिश्रण आणि मळलेली कणिक दोन्ही ५-५ समान भागात विभागावेत. एक कणकेचा गोळा घेउन ३ इंच लाटावा. मध्यभागी ब्रोकोलीच्या मिश्रणाचा एक भाग ठेवून कणकेच्या सर्व बाजू एकत्र करून सील करावे. कोरडे पीठ लावून पराठा लाटावा.
४) तवा तापवून पराठा तेल किंवा तूप सोडून दोन्ही बाजू भाजून घ्याव्यात. पराठा गरमच दही आणि बटर बरोबर सर्व्ह करावे.
टीप:
१) ब्रोकोलीचे स्टफिंग बनवून तसेच जास्त वेळ ठेवले तर त्याला पाणी सुटते आणि पराठे लाटताना फाटतात. यासाठी ब्रोकोली मिक्सरमध्ये बारीक करताना त्यात पाण्याचा अंश नसावा, ती कोरडी असेल याची काळजी घ्यावी. आणि जेव्हा पराठे बनवायचे असतील तेव्हाच स्टफिंग बनवावे.
0 comments:
Post a Comment