Pages

Tuesday, 20 March 2012

कलिंगडाचा ज्यूस - Watermelon Juice

Watermelon Juice in English

वेळ: ५ ते ७ मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

Watermelon juice, how to make watermelon juice at homeसाहित्य:
३ कप कलिंगडाच्या मध्यम फोडी, बिया काढून
१/२ कप संत्र्याचा ज्यूस (आवडीप्रमाणे कमी जास्त करावा)
१/४ टीस्पून काळं मीठ
१/२ टिस्पून आलं, बारीक चिरून
बर्फाचे तुकडे (ऐच्छिक)

कृती:
१) ब्लेंडरमध्ये कलिंगड, संत्र्याचा ज्यूस, काळं मीठ, आणि आलं घालून ब्लेंड करावे. एकजीव झाले कि सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून त्यावर ज्यूस ओतावा. आणि गारच सर्व्ह करावे

टीप:
१) ज्यूसमध्ये कलिंगडाचे बारीक तुकडे सर्व्ह करतेवेळी वरून पेरू शकतो.

0 comments:

Post a Comment