वेळ: ५ मिनिटे
वाढणी: २ कप
२ कप ताक
१/२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून हिंग
१ सेमी आल्याचा तुकडा, ठेचून
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१ आमसुलं (ऐच्छिक)
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मिठ
कृती:
१) तयार ताक एका पातेल्यात काढून ठेवावे.
२) छोट्या कढल्यात तूप गरम करावे. जिरे, हिंग, मिरच्या आणि आल्याचा तुकडा घालून फोडणी करावी. कोथिंबीरही फोडणीतच घालावी. ताकामध्ये हि फोडणी घालून मिक्स करावे. चवीनुसार मिठ घालावे.
३) जर ताक आंबट नसेल तर आमसुल, २-३ चमचे गरम पाण्यात थोडावेळ भिजत ठेवावे आणि हे आंबट पाणी ताकात घालावे.
४) हे ताक गरम केले नाही तरीही चालते. पण गार ताक प्यायचे नसेल तर अगदी मंद आचेवर किंचित कोमट करावे. खुप गरम करू नये नाहीतर ताक फुटते.
जेवताना हे ताक मधेमधे प्यायला तसेच मुगतांदुळाच्या खिचडीबरोबरही हे ताक छान लागते.
टीप:
१) ताक जर आंबट असेल तर आमसूल घालू नये.
0 comments:
Post a Comment