Pages

Tuesday, 6 December 2011

रताळ्याचे चाट - Sweet Potato Chat

Sweet Potato Chat in English

वेळ: १५-२० मिनिटे
वाढणी: ४ ते ५ प्लेट

fasting recipes, ratalyache chat, ratale chat, sweet potato recipesसाहित्य:
१/२ किलो रताळी
१/२ कप हिरवी चटणी
१/२ कप चिंचेची आंबट-गोड चटणी
१ टीस्पून तूप
१ ते २ टीस्पून जिरेपूड
३/४ कप दही, (चमचाभर साखर घालावी)
१/२ कप बटाटा शेव किंवा बटाटा सळी
चवीपुरते मीठ किंवा सैंधव
१ टीस्पून लाल तिखट
बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) रताळी सोलून घ्यावीत आणि त्याचे दीड-दोन इंचाचे फिंगर चिप्स सारखे तुकडे करावेत. तुकडे खूप पातळ किंवा खूप जाड नसावेत, तसेच सर्व तुकडे साधारण एकसारख्या आकाराचे आणि जाडीचे असावेत.
२) नॉनस्टिक पॅनमध्ये १ टीस्पून तूप गरम करावे. त्यात रताळ्याचे तुकडे घालावे. चिमूटभर मीठ पेरावे आणि झाकण ठेवून ४-५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवावे. रताळी एकदम मऊ होईस्तोवर शिजवू नये. आतपर्यंत शिजली पाहिजेत आणि आकारात अख्खीही राहिली पाहिजेत. शक्यतो २ बॅचेस मध्ये रताळी शिजवावीत.
३) रताळी शिजली कि प्रत्येक सर्व्हिंग प्लेटमध्ये साधारण १/२ कप अशी वाढावीत. त्यावर एकेक चमचा हिरवी आणि गोड चटणी घालावी. वरती थोडे मीठ आणि जिरेपूड पेरावी. त्यावर दही घालावे. प्लेटच्या कडेने अजून थोडी हिरवी चटणी आणि गोड चटणी घालावी. वरून शोभेला लाल तिखट पेरावे. थोडी बटाटा शेव किंवा बटाटा सळी घालावी. कोथिंबीरीने सजवावे.
लगेच सर्व्ह करावे.

0 comments:

Post a Comment