Peru (Guava) Raita in English
वेळ: १० मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
साहित्य:
२ मध्यम आकाराचे पिकलेले पेरू
१/२ कप सायीचे दही
२ हिरव्या मिरच्यांची पेस्ट
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/८ टीस्पून मोहोरी पावडर
२ टीस्पून साखर (किंवा चवीनुसार)
चवीपुरते मीठ
कृती:
१) पेरू धुवून घ्यावेत. देठाकडील भाग थोडा कापून टाकावा. पेरू वरवर किसावा. गाभ्याकडील बियांचा भाग घेउ नये.
२) दही फेटून घ्यावे. त्यात किसलेला पेरू घालावा. मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि मोहोरी पावडर घालावी. त्यात साखर आणि मीठही घालावे.
३) सर्व मिक्स करून चव पहावी. जर कोशिंबीर खूप दाट वाटत असेल तर २ टेस्पून दही किंवा २-३ टेस्पून दुध घालावे. वाटल्यास थोडी साखर आणि मिरची घालावी.
बदल म्हणून पेरूची कोशिंबीर छान लागते.
टिपा:
१) पेरू खूप जास्त पिकालेलेही नकोत आणि कच्चेही नकोत.
२) या कोशिंबीरीला पेरूच्या बारीक फोडी केल्या तरी चालतात. पण पेरू किसल्याने कोशिंबीर मिळून येते.
३) दही गोड असावे.
Monday, 29 October 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment