Pages

Thursday, 10 May 2012

कट - Spicy curry (rassa)

Kat in English

वेळ: २५ मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी
साहित्य:
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१ मध्यम टोमॅटो, चिरून
२ मध्यम लसूण पाकळ्या, बारीक चिरून
३ टेस्पून तेल
१ टीस्पून काश्मिरी लाल तिखट (रंगासाठी), १ टीस्पून साधे लाल तिखट (तिखटपणासाठी)
१/४ टीस्पून हळद, १/८ टीस्पून हिंग
१ टेस्पून कांदा लसूण मसाला
१ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून आमचूर पावडर
४ ते ५ कढीपत्ता
चवीपुरते मीठ
कोथिंबीर बारीक चिरून

कृती:
१) १ टेस्पून तेल पातेल्यात गरम करावे. लसूण घालून १० सेकंद परतावे. कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावे. कांदा परतल्यावर टोमॅटो आणि मीठ घालावे. टोमॅटो पूर्ण मऊ होईस्तोवर परतावा. आच बंद करून मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढून ठेवावे.
२) मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करावे. लागल्यास थोडे पाणी घालावे.
३) उरलेले २ टेस्पून तेल त्याच कढईत गरम करावे. हळद, हिंग, कढीपत्ता आणि लाल तिखट घालावे. लगेच कांदा-टोमॅटोची पेस्ट घालावी. गरजेपुरते पाणी घालून कटाची कंसीस्टन्सी सारखी करावी. आता कांदा लसूण मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर आणि मीठ घालावे. काही मिनिटे उकळी काढावी.
हा कट मिसळ किंवा मासवडी यांबरोबर छान लागते.

0 comments:

Post a Comment