Chikwadya in English
साधारण २० मध्यम चिकवड्या
साहित्य:
१/२ कप साबुदाणा
१/२ टीस्पून मीठ
साबुदाणा भिजवायला पुरेसे पाणी
कृती:
१) साबुदाणा भांड्यात ठेवून त्यात साबुदाण्याच्या पातळीवर अर्धा इंच येईल इतपत पाणी घालावे. मीठ घालून हलकेच मिक्स करावे. साबुदाणा किमान ४ ते ५ तास भिजू द्यावा.
२) इडलीस्टॅंडच्या प्रत्येक खोबणीत तेलाचा हात लावून घ्यावा. नंतर भिजलेल्या साबुदाण्याचा एकेरी थर (single layer) पसरवून घ्यावा. इडली कुकरमध्ये तळाला दीड इंच पाणी ठेवावे आणि गरम करावे. पाण्यास उकळी फुटली कि स्टॅंड आत ठेवावा. झाकण लावून घ्यावे. (शिटी काढून टाकावी.) १० मिनिटे वाफ काढावी.
३) वाफ जिरली कि चिकवड्या चमच्याने हलकेच काढून घ्याव्यात. प्लास्टीक पेपरवर घालून उन्हात वाळवाव्यात. एका बाजू वाळली कि बाजू पालटून दुसरी बाजू उन्हात वाळवावी.
टीपा:
१) या रेसिपीमध्ये बरेच बदल करता येतील. जसे साबुदाण्याबरोबर थोडा किसलेला बटाटा असे मिक्स घालू शकतो. किंवा यात थोडे जीरेसुद्धा छान लागेल. किंवा भरडसर वाटलेली मिरची घातल्यास छान चव लागते.
Tuesday, 29 May 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment