वाढणी: ४ ते ५ जणांसाठी
वेळ: २५ ते ३० मिनिटे
२ कप किसलेला दुधी (डिटेल्ससाठी स्टेप २ पहा)
५ कप गरम दुध (शक्यतो होल मिल्क वापरा.)
१/२ कप साखर
१ टीस्पून वेलची पावडर
५ बदाम, ५ पिस्ता
२ टीस्पून तूप
कृती:
१) बदाम आणि पिस्ता २ तास पाण्यात भिजत घालावे. साल काढून पातळ काप करावे.
२) दुधी सोलून घ्यावा. सोललेला दुधी उभा कापून आतील बिया काढून टाकाव्यात. उरलेला दुधी किसून घ्यावा. पाणी काढू नये.
३) जाड बुडाच्या पातेल्यात २ टीस्पून तूप गरम करावे त्यात २ कप दुधी घालून माध्यम आचेवर २-३ मिनिटे परतावा. पातेल्यावर झाकण ठेवून दुधी शिजू द्यावा.
४) आता दुध घालून १०-१२ मिनिटे मिडीयम-लो फ्लेमवर दुधी निट शिजू द्यावा. दुध थोडे आटू द्यावे.
५) वेलचीपूड, साखर आणि बदाम-पिस्त्याचे काप घालावे. २-३ मिनिटे उकळी काढून कोमटसर किंवा थंड करून दुधी खीर सर्व्ह करावी.
टीप:
१) दुधी शिजायच्या आधी साखर घालू नये, दुधी शिजायला वेळ लागतो.
0 comments:
Post a Comment