वेळ: २५ मिनिट्स
४ जणांसाठी
८ मोठे टोमॅटो, जाडसर चिरून
२ मोठी गाजरे, माध्यम चौकोनी तुकडे
१ लहान कांदा, बारीक चिरून
४ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
दीड टीस्पून ऑलिव्ह ऑईल
१/४ ते १/२ कप बेसिल पाने, बारीक चिरून
२ तमालपत्र
१/४ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून साखर (ऐच्छिक)
१/२ कप ताजा ऑरेंज ज्यूस (शक्यतो बिनसाखरेचा)
१/४ कप नारळाचे घट्ट दुध किंवा हेवी क्रीम
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून मिरपूड
कृती:
१) खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात तमालपत्र आणि लसूण घालून परतावे. ५-७ सेकंदानी कांदा घालावा. कांदा थोडासा पारदर्शक झाला कि गाजर घालावे.
२) गाजर घातल्यावर झाकण ठेवून गाजर नरम होईस्तोवर शिजवावे. नंतर टोमॅटोचे तुकडे घालून झाकण ठेवून शिजवावे. टोमॅटो मउसर झाले कि बेसिल पाने घालावीत. झाकण न ठेवता २-३ मिनिटे शिजवावे. गॅस बंद करून मिश्रण ५-१० मिनिटे कोमट होवू द्यावे.
३) तमालपत्र काढून टाकावी. गाजर-टोमॅटोचे मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करावी. हि पेस्ट गाळण्यातून गाळून घ्यावी. लागल्यास थोडे पाणी घालावे. नंतर गाळलेले सूप परत पातेल्यात घ्यावे. त्यात ऑरेंज ज्यूस घालावा. मीठ, साखर, आणि लाल तिखट घालावे. काही मिनिटे उकळवून त्यात क्रीम किंवा नारळाचे दुध घालावे. १-२ मिनिटे कमी आचेवर गरम करावे आणि लगेच सर्व्ह करावे.
सर्व्ह करताना लागल्यास थोडी मिरपूड घालावी.
0 comments:
Post a Comment