वेळ: १५-२० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
२ मोठ्या काकड्या
१/२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
२ चिमटी मिरपूड
२ टीस्पून ऑलिव ऑईल
१/४ कप कांदा, बारीक चिरून
२ लसणीच्या पाकळ्या, बारीक चिरून
१ टीस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) काकड्या सोलून घ्याव्यात. देठं काढून पातळ गोल चकत्या कराव्यात. दोन्ही काकड्यांची चव पहावी कारण कधीकधी काकडी कडवट असते.
२) पातेल्यात तेल गरम करावे. त्यात लसूण परतावी. नंतर कांदा परतावा.
३) कांदा नीट शिजला कि काकडीच्या चकत्या आणि थोडे मीठ घालावे. मिडीयम आणि लो च्या मध्ये आच ठेवावी. झाकण ठेवून १० मिनिटे काकडी शिजू द्यावी. १० मिनिटानी काकडी एकदम मऊ झालेली असेल.
४) हे मिश्रण मिक्सरमध्ये घालावे. मिरची पेस्ट, लिंबू रस आणि मिरपूड घालून एकदम बारीक करावे. कन्सिस्टन्सी अड्जस्ट करावी लागली तरच २-३ चमचे पाणी घालावे.
सूप कोमटसर सर्व्ह करावे किंवा २ तास फ्रीजमध्ये ठेवून कोल्ड सूप म्हणून सर्व्ह करावे. सर्व्ह करताना बारीक चिरलेली काकडी आणि कोथिंबीर यांनी सजवावे.
टीप:
१) हे सूप क्रिमी बनवण्यासाठी काकडी मिक्सरमध्ये बारीक करताना एक आवोकाडो घालावा.
0 comments:
Post a Comment