वेळ: २० ते २५ मिनिटे
५ मोठे टोमॅटो, लालबुंद आणि रसदार
१ टिस्पून गरम मसाला
१ टेस्पून आलेलसूण पेस्ट
१ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून कश्मीरी रेड चिली पाउडर किंवा चिमूटभर लाल रंग
१ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून कसूरी मेथी
१/२ टिस्पून जिरेपूड
२ टिस्पून लिंबू रस
१/४ ते १/२ कप हेवी क्रीम
चवीपुरते मिठ
२ टेस्पून बटर
१/२ टीस्पून साखर (ऐच्छिक)
कृती:
१) टोमॅटो मोठ्या खोलगट काचेच्या भांड्यात ठेवावे. टोमॅटो बुडेस्तोवर पाणी घालावे. ५ ते ७ मिनिटे मायक्रोवेवमध्ये शिजवून घ्यावे. पाणी काढून घ्यावे. आणि फक्त टोमॅटो काढून मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यावी. हि प्युरी गाळून त्यातील बिया आणि साले काढून टाकावीत.
२) पॅनमध्ये बटर गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट आणि लाल तिखट घालावे.१० ते १५ सेकंद परतावे. यात गाळलेली टोमॅटो प्युरी, धणे-जिरेपूड, कसूरी मेथी, मीठ आणि लिंबाचा रस घालावे. १० मिनिटे मंद आचेवर ढवळावे.
३) टोमॅटोचा कच्चा वास गेला कि गॅस बंद करावा. हे मिश्रण थोडे कोमट होवू द्यावे. ब्लेंडरमध्ये घालावे. ७-८ सेकंद ब्लेंड करावे. २-३ टेस्पून हेवी क्रीम घालून ब्लेंड करावे. अशाप्रकारे थोडेथोडे क्रीम घालून ब्लेंड करत राहा. ग्रेव्ही हवी तेवढी क्रिमी झाली कि क्रीम घालणे थांबवावे.
४) हि ग्रेव्ही परत पॅनमध्ये घालावी आणि एकदम मंद आचेवर साधारण ५ मिनिटे गरम करावी.
हि ग्रेव्ही पनीर माखनी किंवा बटर चिकन बनवण्यासाठी वापरू शकतो.
टीपा:
१) थोडीशी साखर घातल्याने चव छान लागते.
२) लिंबू रसाऐवजी चिमुटभर सायट्रिक आम्ल घालावे. टोमॅटो जर आंबट असतील तर लिंबाचा रस किंवा सायट्रिक आम्ल यांचे प्रमाण कमी करावे.
३) या रेसिपीमध्ये १/४ कप काजूची पेस्ट करून घातल्यास दाटपणा छान येतोच आणि चवही छान लागते.
0 comments:
Post a Comment