वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: ३० ते ३५ मिनीटे
१२ ते १५ बटण मश्रुम (मध्यम आकाराचे)
१/२ ते ३/४ कप मटार (मी फ्रोजन वापरले होते)
२ टेस्पून बटर
१ टिस्पून लाल तिखट
१/२ कप कांद्याची पेस्ट
३/४ कप टोमॅटो प्युरी
२ टिस्पून आले-लसूण पेस्ट
अख्खा गरम मसाला - २ वेलची, २ लवंगा, १/२ इंच दालचिनी, ४ मिरी दाणे
१/२ टिस्पून गरम मसाला पावडर
२ ते ३ टेस्पून क्रिम
चवीपुरते मिठ
कृती:
१) कढई गरम करावी त्यात वेलची सोडून बाकिचे अख्खा गरम मसाल्याचे जिन्नस घालून कोरडेच भाजावेत. खलबत्त्यात कुटून बारीक पूड करावी. मश्रुमचे उभे पातळ स्लाईस करावे.
२) कढईत बटर गरम करून त्यात कुटलेली मसाला पूड घालावी. वेलची घालावी. नंतर कांद्याची पेस्ट, आले लसूण पेस्ट आणि लाल तिखट घालावे.
३) कांदा छान परतला गेला कि टोमॅटो प्युरी घालावी. एक उकळी काढून त्यात मटार घालून मध्यम आचेवर ३ ते ४ मिनीटे वाफ काढावी. लागल्यास थोडे पाणी घालावे. मिठ आणि गरम मसाला पावडर घालावी.
४) मटार शिजले कि चिरलेले बटन मश्रुम घालावे. एक-दोन मिनीटं मश्रुम शिजू द्यावे. गॅस बंद करावा आणि क्रिम घालून पटपट ढवळावे.
गरम भाजी पोळीबरोबर सर्व्ह करावी.
0 comments:
Post a Comment