Methi Ladu in English
२५ मध्यम लाडू
वेळ: दिड ते २ तास
साहित्य:
१ कप गव्हाचे पिठ
२ कप सोयाबिन पिठ
१ कप काजू पावडर
१ कप खारीक पावडर
१/२ कप बदाम पावडर
१/२ कप पिस्ता पावडर
२ कप सुकं खोबरं, किसून भाजलेले
५० ग्राम डिंक पावडर
५० ग्राम मेथी
दोन ते अडीच कप गूळ, किसलेला
अंदाजे १/२ किलो तूप
मेथीचे लाडू पाककृती २ - साखर घातलेले मेथीचे लाडू
कृती:
१) कढई चांगली तापवावी. नंतर गॅस बंद करावा व तेवढ्याच उष्णतेवर मेथी भाजून घ्यावी. या मेथीची पूड करावी.
२) साधारण दिड ते दोन कप गरम तूप घ्यावे. यामध्ये मेथी पावडर आणि डिंक पावडर १५ मिनीटे फेसावे. असे १ दिवसाआड ८ दिवस फेसावे. फेसल्याने मेथीचा कडूपणा कमी होतो.
३) काजू, पिस्ता, बदाम, खारीक पावडर प्रत्येकी १ टेस्पून तूपावर भाजावे.
४) गव्हाचे पिठ आणि सोयाबिनचे पिठ थोड्या तूपावर भाजून घ्यावे. (महत्त्वाची टिप पहा)
५) वरील सर्व जिन्नस एकत्र करावे. (काजू-पिस्ता-बदाम-खारीक यांची पावडर, भाजलेले खोबरे, फेसलेले डिंक आणि मेथी, भाजलेले गहू-सोयाबिन पिठ)
६) गूळ पातेल्यात घ्यावा त्यात २ ते ३ चमचे पाणी घालावे. गूळ वितळेस्तोवर कढईत गरम करावा. गूळ वितळला कि गॅस बंद करावा. त्यात वरील एकत्र केलेले जिन्नस मिक्स करावे आणि लाडू वळावे.
टीप:
१) जर शक्य असेल तर अख्खे गहू आणि सोयाबिन तूपावर भाजून त्याचे पिठ करावे.
२) लाडू वळताना मिश्रण थोडे अजून ओलसट हवे असेल तर तयार मिश्रणात गरजेपुरते पातळ गरम तूप घालावे. मिक्स करून लाडू वळावेत.
Thursday, 14 October 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment