Bottle gourd Sabzi in English
वेळ: १५ ते २० मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
साहित्य:
२ कप, दुधीचे मध्यम चौकोनी तुकडे (दुधी सोलून आतील बिया काढणे)
१ टिस्पून + १ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
२ ते ३ टेस्पून दाण्याचा कूट
१/४ ते १/२ कप दुध
चवीपुरते मिठ
२ लाल सुक्या मिरच्या
१/२ टिस्पून उडदाची डाळ
सजावटीसाठी, बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) कढईत १ टिस्पून तूप गरम करून त्यात जिरे घालून फोडणी करावी. जिर्याचा रंग थोडा बदलला कि त्यात दुधी फोडणी़स घालावा. मिठ घालावे. १-२ वाफा काढाव्यात.
२) नंतर दुध घालावे आणि दुधी शिजू द्यावा. दुधी शिजला कि दाण्याचा कूट घालून १-२ मिनीट शिजवावे.
३) भाजी तयार झाली कि लहान कढल्यात १ टिस्पून तूप गरम करावे. २ लाल मिरच्या हाताने तोडून घ्याव्यात. आधी उडदाची डाळ फोडणीस टाकून गुलाबी होवू द्यावी. नंतर लगेच मिरच्या घालून फोडणी तयार करावी. हि फोडणी तयार भाजीवर घालून भाजी लगेच सर्व्ह करावी.
टीप:
१) बरेचजण उपवासाला दुधी खातात. तेव्हा हि भाजी नुसती किंवा साबुदाण्याच्य खिचडीबरोबर भरीला खाऊ शकतो. फक्त वरून जी तूप-जिरे-उडीद डाळ यांची फोडणी घातली आहे ती घालू नये.
Tuesday, 15 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment