साधारण १२ ते १५ वड्या
वेळ: पूर्वतयारी:- १५ ते २० मिनीटे । मायक्रोवेव्ह:- ५ ते ७ मिनीटे
१ कप बेसन
१ कप आंबट ताक (जरा घट्ट)
दिड ते पावणेदोन कप पाणी
पाउण ते एक टिस्पून मिरचीचा ठेचा
१/२ टिस्पून हळद
१/२ टिस्पून हिंग
फोडणीसाठी : २ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, २ ते ३ चिमटी हिंग
खवलेला ताजा नारळ, गरजेनुसार
वरून पेरायला थोडे लाल तिखट
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ
मिश्रण पसरवण्यासाठी कालथा
जाड प्लास्टिकचा लांब कागद
कृती:
१) बेसन, ताक, पाणी एकत्र करावे. बेसनाच्या गुठळ्या न होता मिश्रण भिजवावे. त्यात मिरचीचा ठेचा, हळद आणि हिंग घालावे. चवीपुरते मीठ घालावे. सर्व मिश्रण एकदम स्मूद करून घ्यावे.
२) बेसनाचे हे मिश्रण शिजवण्यापुर्वी प्लास्टिकचा कागद ओट्यावर किंवा टेबलावर पसरवून ठेवावा.
३) मायक्रोवेवसेफ भांड्यात सर्व मिश्रण घालावे. हाय पॉवरवर ५० सेकंद मिश्रण शिजवावे. भांडे बाहेर काढून व्यवस्थित ढवळावे. किंचीत गुठळ्या होण्याची शक्यता असते तेव्हा एगबिटरने मिश्रण निट एकजीव करून घ्यावे. मिश्रण शिजेस्तोवर ३०-४० सेकंद मायक्रोवेव करत राहावे. साधारण २ ते ३ वेळा मिश्रण मायक्रोवेव करावे लागते. मिश्रण खुप दाट नाही आणि खुप पातळ नाही असे झाले कि मिश्रण शिजले असे समजावे.
४) मिश्रण थंड होवू देवू नये. लगेच कालथ्याने मिश्रणाचा पातळ थर प्लास्टिक कागदावर पसरावा. थोडे थंड होवू द्यावे.
५) कढल्यात तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग घालून फोडणी करावी. आणि मिश्रणाच्या पातळ थरावर चमच्याने फोडणी पसरावी. म्हणजे फोडणी नीट पसरली जाते.
६) त्यावर खवलेला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी. थोडे लाल तिखट पेरावे. नंतर सुरीने ५ इंच पट्ट्या कापाव्यात. त्याची सुरळी (गुंडाळी)करावी आणि मग त्या सुरळीचे ३-४ भाग करावेत.
७) सर्व्ह करताना सुरळीच्या वड्यांवर थोडी कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालावा.
सुरळीच्या वड्या - शेगडी (गॅस) वापरून
टीप:
१) मिश्रणाचा पातळ थर करण्यासाठी स्टीलची ताटेसुद्धा वापरू शकतो पण त्यामुळे खुप ताटे वापरली जातात.
२) जर फोडणी फक्त वड्यांवर आवडत असेल तर आपल्या आवडीनुसार सुरळ्या केल्यानंतर त्यावर फोडणी घालावी.
३) सुरळीच्या वड्या करताना नारळ आणि कोथिंबीर आपण आधीच पेरले आहे त्यामुळे चव छान येते. पण सुरळी करताना थोडा त्रास होवू शकतो. अशावेळी मिश्रणाचा पातळ थर केल्यावर त्यावर फक्त फोडणीच घालावी. सुरळी करून मग वरून कोथिंबीर आणि नारळ पेरावे.
Labels:
Surali Vadi, Khandvi, Gujrati Snack
0 comments:
Post a Comment