Lemon Juice in English
वेळ: साधारण २५ मिनीटे
साधारण ३ कप लिंबाचे टिकाऊ सरबत (यातून साधारण २०-२२ जणांना लिंबाचे सरबत बनू शकेल)
साहित्य:
१ कप लिंबाचा रस (साधारण १२ मोठी रसाची लिंबं)
अडीच कप साखर
३/४ कप पाणी
२ टिस्पून मिठ
कृती:
१) लिंबाचा रस गाळून घ्यावा म्हणजे बिया आणि लिंबाचा किंचीत राहिलेला गर निघून फक्त लिंबाचा रस उरेल.
२) अडीच कप साखर आणि ३/४ कप पाणी एका पातेल्यात एकत्र करावे. गोळीबंद पाक करावा (महत्त्वाची टिप).
३) पाक तयार झाला कि गॅस बंद करावा. तयार पाकात लिंबाचा रस घालून ५ मिनीटे ढवळावे. नंतर जरा निवेस्तोवर अधूनमधून ढवळावे.
४) तयार लिंबू सरबत काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवावा.
लिंबाचे सरबत करताना १ ग्लासभर लिंबाचे सरबत बनवायचे असल्यास, एका ग्लासमध्ये २ मोठे चमचे लिंबाचा पाक घालावा, गार पाणी घालावे आणि मिक्स करावे. मिठाची गरज लागल्यास किंचीत मिठ घालावे. तसेच बर्फही घालू शकतो.
टीप:
१) लिंबाच्या सरबतात चिमूटभर वेलचीपूड घातली तरी छान फ्लेवर येतो.
२) गोळीबंद पाक म्हणजे पाकाचा थेंब गार पाण्यात टाकल्यावर टणक गोळी तयार झाला पाहिजे. पण लिंबू सरबताला मऊसर गोळी (Soft Ball Consistency) तयार झाली तरीही चालेल.
Labels:
Lemon Juice, Homemade Lemonade, limbu sarbat
Thursday, 18 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment