Vari Tandulacha Bhat in English
वेळ: १० ते १५ मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वरी तांदूळाचा भात शेंगदाण्याच्या आमटीबरोबर अतिशय सुरेख लागतो. शेंगदाणा आमटीच्या कृतीसाठी इथे क्लिक करा.
इतर संबंधित पाककृती : उपासाची बटाटा भाजी । उपासाच्या इतर पाककृती.
साहित्य:
३/४ कप वरी तांदूळ (उपासाची भगर)
अडीच कप गरम पाणी
१ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
चवीपुरते मिठ
कृती:
१) पातेल्यात तूप गरम करावे, त्यात जिरे घालून थोडे तडतडू द्यावे. वरी तांदूळ घालून थोडावेळ परतावे.
२) तांदूळ जरासे गुलाबीसर झाले कि अडीच कप गरम पाणी घालावे. चवीनुसार मिठ घालून ढवळावे आणि पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर वरी तांदूळ शिजू द्यावा.
टीप:
१) वरी तांदूळ आपापल्या चवीनुसार बनवता येतो. काही जण प्लेन वरी तांदूळ बनवतात. ज्यामध्ये तूपात फक्त तांदूळ परतून मिठ घालून शिजवतात.
२) वरी तांदूळ शिजताना एखादे आमसुल घातल्यास छान आंबटसर चव येते.
३) जर एकदम मऊसर भगर (वरी तांदूळ) हवी असेल तर पाण्याचे प्रमाण पाऊण कपाने वाढवावे.
Labels:
vari Tandul, Bhagar, Samo seeds rice, fasting recipes,
Thursday, 11 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment