Amla Sharbat in English
वेळ: १५ ते २० मिनिटे
वाढणी: ८ ते १० जणांसाठी
साहित्य:
७ ते ८ आवळे
१ टीस्पून किसलेले आले
साखर
२ टीस्पून लिंबाचा रस
कृती:
१) आवळे कुकरमध्ये वाफवून घ्यावे. बिया काढून फक्त गर घ्यावा.
२) गराच्या दीडपट साखर घ्यावी. (गोड जास्त आवडत असल्यास साखर थोडी जास्त घेतली तरी चालेल)
३) साखर, आवळ्याचा गर, आले आणि लिंबाचा रस एकत्र करून घट्टसर पल्प बनवा.
हा पल्प प्लास्टिक किंवा काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावा.
सरबत बनवताना २ ते ३ टेस्पून पल्प घेउन त्यात २ चिमटी मीठ घालावे. आणि ग्लासभर पाणी घालावे.
टीपा:
१) आवळ्याचे बारीक कण नको असल्यास पल्प चाळणीत गाळून घेतला तरी चालेल.
२) पल्प कोरड्या बरणीत भरावा. तसेच पल्प काढण्यासाठी चमचा वापराल तोही कोरडा असावा.
३) हा पल्प फ्रीजरमध्येही स्टोअर करता येतो. बर्फाच्या ट्रेमध्ये पल्प भरून फ्रीझ करावे. पल्प गोठला कि ट्रेमधून काढून हे क्युब्ज प्लास्टिक झिपलॉक पिशवीत ठेवावे. आणि परत फ्रीजरमध्ये ठेवावे. जेव्हा लागेल तेव्हा एक-दोन क्यूब्ज वापरून सरबत बनवता येईल. (जर वीजकपातीचा प्रॉब्लेम असेल तर ही पद्धत अवलंबू नकात. फ्रीजमध्येच बरणीत भरून ठेवा. कारण पल्प गोठून वितळला आणि परत गोठला कि त्याची चव उतरते.)
४) आवडत असल्यास सरबतात थोडेसे काळे मीठ घालावे. छान स्वाद येतो.