वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
साहित्य:
फणसाच्या ३० ते ३५ आठळ्या
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी जिरे, १/४ टीस्पून हिंग, १/२ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट
२ टेस्पून ताजा खवलेला नारळ
१ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून साखर (ऐच्छिक)
फणसातील आठळ्या(फोटो)
कृती:१) आठळ्या कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. उकडताना थोडे मीठ घालावे.
२) आठळ्या शिजल्या कि सोलून आतील शिजलेल्या बिया तेवढ्या ठेवाव्यात. या बिया मध्यम आकारात चिरून घ्याव्यात.
३) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. यात चिरलेल्या आठळ्या घालाव्यात. मध्यम आचेवर ५ मिनिटे वाफ काढावी.
४) यात कोथिंबीर, नारळ, साखर आणि लागल्यास मीठ घालून मिक्स करावे. २-३ मिनिटे परतून आठळ्यांची भाजी पोळीबरोबर सर्व्ह करावी.
टीप:
१) आठळ्या शिजवण्यासाठी वेगळा कुकर लावायची आवश्यकता नाही. कुकरमध्ये भाताच्या डब्यावर अजून एक डबा आठळ्यांचा ठेवावा.
0 comments:
Post a Comment