वेळ: ३५ ते ४० मिनिटे
अडीच कप बेसन (साधारण सव्वा तीनशे ग्राम)
१/२ कप तेल
१/४ कप लसूण पेस्ट
१/२ कप पाणी
२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
१ टीस्पून ओवा
१/२ टीस्पून पांढरी मिरपूड
चवीपुरते मीठ
तळणासाठी तेल
कृती:
१) बेसन, पांढरी मिरपूड, आणि मीठ एकत्र करून चाळून घ्यावे.
२) १/२ कप तेल कडकडीत तापवावे. आणि बेसनाच्या मिश्रणात घालावे. चमच्याने मिक्स करावे.
३) तवा गरम करावा आणि गरम झाला कि बंद करावा. त्यात ओवा अगदी हलकेच भाजून घ्यावा. खलबत्त्यात भरडसर कुटून घ्यावा.
४) १/२ कप गरम पाणी घ्यावे. त्यात लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, आणि ओवापुड घालून मिक्स करावे. लसूण हाताने चुरडावी म्हणजे लसणीचा स्वाद पाण्यात पुरेपूर उतरेल. हे पाणी बारीक जाळीच्या गाळण्यातून गाळून घ्यावे.
५) हे पाणी बेसनामध्ये हळू हळू घालावे आणि घट्टसर पण चिकट असे मिश्रण बनवावे.
६) शेव पाडायच्या यंत्राला आतून तेलाचा लावून घ्यावा. बेसनाचे भिजवलेले पीठ यामध्ये घालावे.
७) कढईमध्ये तेल गरम करावे. तेल गरम झाले कि आच मिडीयम हायवर ठेवावी. प्रेस करून शेव पाडावी. शेव पाडायची योग्य पद्धत म्हणजे शेव गोलाकार पाडावी. म्हणजे तेलात बाहेरून वर्तुळाकार फिरवत एक फेरा झाला कि तो लगेच आतमध्ये चक्र पूर्ण करावे. कढई जेवढी मोठी तेवढे फेरे करावेत. शक्यतो शेव एकावर एक अशी पाडू नये, कच्ची राहते आणि मऊ पडते.
८) एक बाजू तळली गेली कि हलकेच पलटून दुसरी बाजू तळावी. अशाप्रकारे सर्व भिजवलेल्या पिठाची शेव बनवावी.
९) शेव तळली कि टिश्यू पेपरवर काढून ठेवावी. म्हणजे अधिकचे तेल निघून जाईल. गार झाले कि हाताने चुरडून हवाबंद डब्यात भरून ठेवावी.
टीपा:
१) मिरची पेस्ट ऐवजी २ टीस्पून लाल तिखट वापरले तरीही चालते. पण तिखटाचा रंग खूप भडक असेल तर शेवेचा रंग लालसर होतो.
२) पाण्याचे प्रमाण काही टेस्पून कमी जास्त होवू शकते. त्यामुळे बेताबेताने पाणी घालावे. मिश्रण घट्ट आणि चिकट झाले पाहिजे.
३) लसूण, ओवा, किंवा मिरची बेसनात डायरेक्ट घालून शेव पाडू नये. ओवा, लसूण यांचे कण शेव पडायच्या जाळीत अडकून शेव नीट पडत नाही. म्हणून पाण्यात सर्व घालून पाण्याला त्याचा स्वाद द्यावा आणि हे पाणी पीठ भिजवायला वापरावे.
0 comments:
Post a Comment