Masoor Pulao in English
वाढणी: ३ जणांसाठी
वेळ: ४० ते ५० मिनीटे
साहित्य:
::भातासाठी ::
दिड कप बासमती राइस
३ कपा गरम पाणी
१ बादयाण (स्टार आनिस), २ तमालपत्र, 2 लवंगा
१ टेस्पून तूप
१/२ टीस्पून मिठ
::मसूर ग्रेवी ::
१/२ कप मसूर
१ टेस्पून तूप
२ वेलची, २-३ काळी मिरी
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट (मी रंगासाठी १/२ टीस्पून काश्मीरी लाल तिखट आणि तिखटपणासाठी १/२ टीस्पून नेहमीचे लाल तिखट वापरले होते)
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून आलं पेस्ट
१ टीस्पून लसूण पेस्ट
१/२ कप दही
१ टीस्पून धणे पूड
१/२ टीस्पून जिरे पूड
१ टीस्पून गरम मसाला
२ टेस्पून बेदाणे, थोडेसे काजू
चवीपुरते मिठ
कृती:
१) मसूर रात्रभर किंवा ७ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवावे. कूकरमध्ये १ शिट्टी करून मसूर पाणी ना घालता शिजवून घ्यावे. शिजवताना थोडे मिठ घालावे.
२) पॅनमध्ये तूप गरम करून त्यात वेलची आणि मिरी घालावी. १० सेकंद परतावे. हळद, लाल तिखट आणि आलेलसूण पेस्ट घालून परतावे. कांदा घालून पारदर्शक होईतोवर परतावे.
३) आता शिजलेले मसूर आणि १/२ कप पाणी घालावे. थोडेसेच मिठ घालावे कारण आधी मसूर शिजताना मिठ घातले होते. थोडा वेळ शिजू द्यावे. आता गरम मसाला, धणे-जिरेपूड, बेदाणे, काजू घालून मिक्स करावे. चव पाहून गरजेनुसार मसाला घालावा. गॅसवरून बाजूला काढावे. ही ग्रेव्ही घट्टसरच असावी कारण थंड झाल्यावर यात नंतर दही घालायचे आहे.
४) ग्रेव्ही जरा गार झाली की त्यात घोटलेले दही घालून निट मिकस करावे. लागल्यास थोडे मिठ घालावे.
५) बासमती तांदूळ १० मिनीटे पाण्यात भिजवून ठेवावा. नंतर पाणी काढून टाकावे आणि तांदूळ २० मिनिट्स निथळत ठेवावा.
६) एक मिडीयम सॉसपॅन गरम करावा. त्यात तूप घालून वितळू द्यावे. स्टार आनिस, तमालपत्र, आणि लवंगा घालून १० सेकंद परतावे. निथळलेला तांदूळ घालून चांगला कोरडा होईस्तोवर परतावे. तांदूळ चांगला परतला गेला की तांदळाचे टेक्सचर बदलते.
७) तांदूळ चांगला परतला गेला की गरम पाणी घालावे. ढवळून झाकण न ठेवता मोठ्या आचेवर उकळू द्यावे. भाताच्या पृष्ठभागावर पाणी दिसायचे बंद झाले कि लगेच आच लहान करावी आणि झाकण ठेवून भाताला वाफ काढावी. भात नीट शिजू द्यावा.
शिजलेला भात थोडावेळ तसाच ठेवावा. कारण गरम भातात ग्रेव्ही मिक्स केली तर भाताची शीते मोडतील.
८) काट्याने (फोर्क) भात फ्लफ करून घ्यावा. एकूण ग्रेव्हीतील १/२ ग्रेव्ही घालून भात हलकेच मिक्स करावा. लागेल तशी ग्रेव्ही घालावी.
९) थोडे तूप घालून मिक्स करावे. आणि १० मिनीटे एकदम मंद आचेवर झाकण ठेवून भात गरम होऊ द्यावा.
गरम गरम पुलाव रायत्याबरोबर सेर्व्ह करावा. [रायत्याची रेसिपी]
टीपा:
१) तांदूळ मोठ्या आचेवर ६ ते ८ मिनीटे भाजल्याने भात मोकळा होतो.
२) जर मसूर भिजावायला जास्त वेळ नसेल तर २ तासा एकदम गरम पाण्यात मसूर भिजवावेत.
३) तूप जर कमी वापरायचे असल्यास ग्रेव्ही तेलात बनवावी आणि शेवटी जे तूप घालायचे आहे ते घालू नये.
Tuesday, 7 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment