Paavbhaji in English
४ जणांसाठी
वेळ: पूर्वतयारी २० मिनीटे | कूकिंग टाईम ३० मिनीटे
साहित्य:
२ मध्यम कांदे, बारीक चिरून (टीप १)
३ मोठे टोमॅटो, बारीक चिरून
१ टोमॅटोची प्युरी
२ मध्यम बटाटे, उकडून
२ टेस्पून मिरची आले लसूण पेस्ट (२ हिरव्या मिरच्या + ५ लसूण पाकळ्या + १/२ इंच आल्याचा तुकडा)
१/४ कप फ्लॉवरचे तुरे, वाफवलेले
१/४ कप मटार, वाफवलेले
१/४ कप भोपळी मिरची, एकदम बारीक चिरून
१/४ कप गाजर, बारीक चिरून वाफवून घ्यावे
मसाले: १/२ टिस्पून आमचूर पावडर, २ टिस्पून लाल तिखट, १/८ टिस्पून मिरपूड, १ टिस्पून धणेपूड, १/२ टिस्पून गरम मसाला, १/२ टिस्पून बडिशेपची पावडर
१ टेस्पून पावभाजी मसाला
३ टेस्पून बटर + १ टेस्पून तेल
चवीपुरते मिठ
सजावटीसाठी: बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, लिंबाच्या फोडी
कृती:
१) कढईत तेल आणि बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा अर्धवट परतला कि आले-लसूण-मिरची पेस्ट घालावी.
२) कांदा निट परतला कि त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून मध्यम आचेवर टोमॅटो एकदम मऊ होईस्तोवर शिजू द्यावा. टोमॅटो प्युरी घालून मध्यम आचेवर २ ते ४ मिनीटे उकळी काढावी. मिश्रण खुप घट्ट झाले थोडे पाणी घालावे.
३) यामध्ये आमचुर पावडर, लाल तिखट, मिरपूड, धणेपूड, गरम मसाला, बडीशेप पावडर, चवीपुरते मिठ आणि थोडा पावभाजी मसाला घालून मिक्स करावे. मिश्रण किंचीत पातळ असावे. हा मिश्रण मसाला पावकरीता वापरू शकतो.
४) यामध्ये अर्धवट मॅश केलेले फ्लॉवर, गाजर आणि मटार घालावे. १ टेस्पून बटर आणि उरलेला पावभाजी मसाला घालावा. उकडलेले बटाटे व्यवस्थित कुस्करून घालावा. पाणी घालावे, ढवळावे. बारीक चिरलेली भोपळी मिरची घालावी. गरजेनुसार मिठ-मसाला घालावा. मध्यम आचेवर ८ ते १० मिनीटे शिजू द्यावे.
गरमागरम पावभाजी मसालापाव बरोबर सर्व्ह करावी. सर्व्ह करताना भाजीवर बटर, कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावा.
पावभाजी प्रकार १ - कृतीसाठी इथे क्लिक करा
टीप:
१) अमेरकेतील वाचकांसाठी सूचना - १ पांढरा मोठा कांदा आणि ४ मोठे रोमा टोमॅटो (३ चिरून १ प्युरी करून) वापरावे.
२) तिखटपणा आवडीनुसार कमीजास्त करावा.
Labels:
Pav bhaji, bombay chaat, Bombay Pav bhaji, restaurant style pav bhaji
Thursday, 29 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment