वेळ: ३० ते ४० मिनीटे (समोसे तयार असल्यास)
सर्व्हींग - ३ जणांसाठी
साहित्य:
६ तयार समोसे (मध्यम आकाराचे) - समोसा रेसिपीसाठी इथे क्लिक करा
१/४ कप हिरवी चटणी
१/४ कप चिंचगूळाची चटणी किंवा खजूराची चटणी (कृतीसाठी इथे क्लिक करा)
१/२ कप घोटलेले दही + चिमूटभर मिठ
१ टिस्पून चाट मसाला
१/२ टिस्पून सैंधव मिठ (काळे मिठ)
१/२ टिस्पून लाल तिखट
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ बारीक शेव
चना मसाला ग्रेव्ही
१ कप शिजलेले पांढरे चणे (काबुली चणे)
फोडणीसाठी: १ टिस्पून तेल, दोन चिमटी जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट
१/२ कप चिरलेला कांदा + २ लसूण पाकळ्या + १/२ इंच आले + १ हिरवी मिरची ची पेस्ट
१ मध्यम टोमॅटोची प्युरी
१ टिस्पून छोले मसाला
१/४ टिस्पून आमचुर पावडर
चवीपुरते मिठ
कृती:
चना मसाला ग्रेव्ही
१) कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात कांदा+ लसूण + आले + हिरवी मिरची यांची पेस्ट घालून परतावे. कांदा परतला गेला कि त्यात टोमॅटोची प्युरी घालून एक उकळी काढावी. शिजलेले चणे, आमचुर पावडर, छोले मसाला आणि चवीपुरते मिठ घालावे. थोडे पाणी घालून कढईवर झाकण ठेवून ५ ते ७ मिनीटे चणे शिजवावे.
समोसा चाटसाठी
२) ३ प्लेट्स तयार कराव्यात. प्रत्येक प्लेटमध्ये २ समोसे ठेवावे आणि किंचीत फोडून घ्यावे. त्यावर १ डाव चण्याची ग्रेव्ही घालावी. त्यावर चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालावा. चाट मसाला आणि सैंधव मिठ भुरभूरावे. नंतर हिरवी चटणी आणि गोड चटणी घालावी. घोटलेले दही घालावे. परत गोड चटणी आणि हिरवी चटणी घालावी. थोडे लाल तिखट भुरभूरावे. कोथिंबीर आणि शेव घालून सजावट करावी.
Labels:
Samosa Chat,Indian Chaat Recipe, Samosa Chaat
0 comments:
Post a Comment