साधारण १५ ते १६ मध्यम समोसे
वेळ: पूर्वतयारी (भाजी, मैद्याचे भिजवलेले पिठ) - २५ मिनीटे । समोसे - २० मिनीटे
तसेच हे समोसे वापरून चविष्ट असे समोसा चाट बनवू शकतो. - समोसा चाटची कृती
साहित्य:
४ मध्यम बटाटे
१ कप मटार (फ्रोजन)
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/४ टिस्पून जिरे, २ चिमटी हिंग, १/२ टिस्पून लाल तिखट
८ ते १० हिरव्या मिरच्या
१/२ इंच आले
१/२ टिस्पून बडीशेप
७ ते ८ मिरीदाणे, कुटलेले
१ टिस्पून गरम मसाला
१/४ टिस्पून धणे-जिरेपूड
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून साखर
तळण्यासाठी तेल
कव्हरसाठी
२ कप मैदा
३ टेस्पून तेल
अर्धा ते १ टिस्पून ओवा
चवीपुरते मिठ
पाणी, पिठ मळण्यासाठी
कृती:
बटाट्याचे स्टफिंग
१) बटाटे उकडून घ्यावे. सोलून, चिरून घ्यावे.
२) हिरव्या मिरच्या कुटून त्याची पेस्ट करून घ्यावी. आले बारीक किसून घ्यावे. किंवा आल्याची पेस्ट वापरावी.
३) कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात जिरे, हिंग, लाल तिखट आणि बडीशेप घालून १० सेकंद परतावे. नंतर हिरवी मिरचीची पेस्ट आणि किसलेले आले घालावे. काही सेकंद परतावे.
४) नंतर वाटाणे घालावेत. झाकण ठेवून २ ते ३ मिनीटे शिजू द्यावे. नंतर चिरलेले बटाटे घालून व्य्वस्थित मिक्स करावे. वाटल्यास मॅशरने थोडे मॅश करून घ्यावे. पण जास्तही मॅश करू नयेत. आता मिठ, गरम मसाला, आमचूर पावडर, धणेजिरेपूड, साखर आणि कुटलेली काळी मिरी घालावी. व्यवस्थित मिक्स करावे. झाकण ठेवून मंद आचेवर २ ते ३ मिनीटे वाफ काढावी. समोसे बनवण्यापूर्वी हे मिश्रण पूर्ण गार होवू द्यावे.
समोशाच्या कव्हरसाठी
१) एका मिक्सिंग बोलमध्ये मैदा आणि तेल एकत्र करावे. पिठाला तेल समान लागेल असे मिक्स करून घ्यावे. ओवा आणि मिठ घालावे. पाणी घालून मध्यमसर मळून घ्यावे. २० मिनीटे झाकून ठेवावे.
२) २० मिनीटांनी मळलेले पिठ ८ ते १० समान गोळ्यांमध्ये विभागून घ्यावे.
समोसा
१) विभागलेल्या गोळ्यापैकी एक गोळा गोल आकारात, पातळसर लाटून घ्यावा. सुरीने मधोमध कापून, २ समान अर्धे भाग करावे. कडेला पाण्याचे बोट लावावे. दोन कडा जोडून व्यवस्थित सिल करून घ्याव्यात. कडा जोडल्यावर कोनसारखा आकार तयार होईल. या कोनमध्ये १ चमचा सारण भरून किंचीत आत ढकलावे. ओपन असलेली बाजू एकावर एक ठेवून जोडावी आणि सिल करावी. अशाप्रकारे सर्व समोसे तयार करावेत.
२) समोसे तळण्यासाठी कढईत तेल गरम करावे. समोसे तेलात बुडतील इतपत तेल असावे. समोसे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
समोसे हिरव्या चटणीबरोबर किंवा खजूराच्या आंबटगोड चटणीबरोबर सर्व्ह करावे.
Labels:
Punjabi Samosa, North Indian Snack, Samosa Recipe
0 comments:
Post a Comment