Pages

Thursday, 3 June 2010

बास्केट चाट - Basket chaat

Basket Chat in English

सर्व्हिंग्ज: ३
वेळ: १५ मिनीटे

Indian Chaat, Chaat food, Mumbai street chaat, Mumbai street food, bhelpuri, pani puri, sevpuri, aloo chaat, Indian appetizersसाहित्य:
२१ Tostito's Corn Scoops
३/४ कप उकडून कुस्करलेला बटाटा
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१/४ कप हिरवी चटणी
१/२ कप चिंचगूळाची चटणी
१/२ कप घुसळलेले दही (यामध्ये चिमूटभर मिठ आणि १ टिस्पून साखर घालावी)
१/२ कप बारीक शेव
२ टेस्पून चाट मसाला
२ टिस्पून काळे मिठ
१ टिस्पून लाल तिखट (ऐच्छिक)
चवीनुसार मिठ
बारीक चिरलेली कोथिंबीर, सजावटीसाठी

कृती:
१) सर्व्ह करण्यासाठी ३ प्लेट घ्या. प्रत्येक प्लेटमध्ये ७ स्कूप्स ठेवा. प्रत्येक स्कूपमध्ये १ ते दिड टिस्पून कुस्करलेला बटाटा घाला. त्यावर थोडा-थोडा कांदा आणि टोमॅटो घाला.
२) त्यावर थोडेसे काळे मिठ आणि चाट मसाला पेरा. त्यावर हिरवी आणि चिंचगूळाची चटणी चवीनुसार घाला.
३) नंतर वरती फेटलेले दही घाला आणि त्यावर अगदी किंचीत लाल तिखट पेरा.
शेवटी कोथिंबीर आणि शेव घालून सजवा आणि लगेच सर्व्ह करा.
आधी एका स्कूपची चव पाहून लागल्यास साधे मिठ भुरभुरवा.

टीप:
१) तुम्ही स्कूपमधल्या फिलींगचा क्रम बदलू शकता. पण ओले जिन्नस (चटण्या आणि दही) शेवटी घालून कोथिंबीर आणि शेवेने सजवा. ओले जिन्नस आधी घातल्यास स्कूप नरम पडण्याची शक्यता असते.

Labels:
Chaat, Basket Chaat, Sev Puri, Instant Sev puri recipe

0 comments:

Post a Comment