Pages

Monday 26 November 2012

कॉर्नची उसळ - Corn Usal

Corn Usal in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
१ कप व्हाईट कॉर्नचे दाणे
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट
२ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
२ लहान कोकमाचे तुकडे
१ टेस्पून गूळ किंवा साखर
२ टेस्पून कोथिंबीर
चवीपुरते मीठ

कृती:
१) कॉर्न प्रेशर कुकरमध्ये २ ते ३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावे. शिजवताना १/४ टीस्पून मीठ घालावे.
२) कढईत २ टीस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि नारळ घालावा. काही सेकंद परतावे.
३) शिजलेले कॉर्न घालावे. थोडे पाणी आणि कोकम घालावे. चव पाहून लागल्यास मीठ घालावे. झाकण ठेवून ५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.
४) गूळ घालून २ मिनिटे उकळी काढावी.
हि उसळ पोळीबरोबर छान लागते.

टिप:
१) व्हाईट कॉर्न चवीला गोड नसतात. त्यामुळे साखर किंवा गूळ घालावा. तसेच कॉर्न कोवळे असतील तर कुकरची एकच शिट्टी करून कॉर्न शिजवावे.

0 comments:

Post a Comment