Pages

Thursday 23 August 2012

मोरंबा - Moramba (पिकलेल्या आंब्याचा)


वेळ: २५ ते ३० मिनिटे
साहित्य:
२ कप हापूस आंब्याचे लहान पिसेस (टीप १ आणि २)
४ कप साखर
५ ते ६ लवंगा

कृती:
१) मध्यम आकाराचे नॉनस्टीक पातेले घ्यावे. त्यात आंब्याचे तुकडे आणि साखर एकत्र करून मध्यम आचेवर गरम करत ठेवावे.
२) आंब्याचे तुकडे, लवंगा आणि साखर उकळवावे. साखर वितळली कि गरजेपुरती कंसीस्टंसी येईस्तोवर आटवावे. खूप जास्तही आटवू नये कारण थंड झाल्यावर मोरंबा अजून घट्ट होतो.
तयार मोरंबा काचेच्या बरणीत भरून ठेवावा.
टीपा: 
१) खूप जास्त पिकलेला आंबा वापरू नये. जास्त पिकलेला आंबा शिजताना विरघळतो, फोडी अख्ख्या राहत नाहीत.
२) आंबा सोलून २ सेमी तुकडे करावे. आतील बाठ काढून टाकावी.
३) लवंगेऐवजी वेलचीही घालू शकतो.
४) कंसीस्टंसी पातळ ठेवली तरी चालेल, फक्त मोरंबा फ्रीजमध्ये ठेवावा.

0 comments:

Post a Comment