Pages

Tuesday 16 October 2012

पातीकांदा चटणी - Spring Onion chutney


वेळ: ५ मिनिटे
३/४ कप चटणी

साहित्य:
३/४ कप पाती कांद्याची हिरवी पात, बारीक चिरून
१/२ कप सायीचे दही (महत्त्वाची टिप १ पहा)
२ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी: १ टीस्पून तूप, १/२ टीस्पून उडीद डाळ, २ लाल सुक्या मिरच्या, २ चिमटी हिंग, ५-६ कढीपत्ता पाने
चवीपुरते मीठ

कृती:
१) चिरलेली पात, दही, मीठ आणि हिरव्या मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये वाटावे. चटणी एका वाडग्यात काढावी.
२) कढले गरम करून त्यात तूप घालावे. तूप गरम झाले कि त्यात उडीद डाळ घालून लालसर होईस्तोवर परतावे. नंतर लाल मिरच्या, हिंग आणि कढीपत्ता घालावा. हि फोडणी चटणीवर घालावी.
मिक्स करून सर्व्ह करावी. हि चटणी कोणत्याही भजीबरोबर किंवा डोसा, उत्तप्पा, कोथिंबीर वडी यासारख्या कोणत्याही तिखटमिठाच्या पदार्थांबरोबर छान लागते.

टिपा:
१) जर सायीचे दही नसेल तर साधे दही आणि दुधावरील साय हे मिक्स करून वापरावे. फक्त साधे दही थोडावेळ सुती कपड्यात बांधून टांगून ठेवावे. यामुळे चटणी पातळ होणार नाही.
२) तिखटपणा कमी जास्त करण्यासाठी हिरव्या मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करावे.
३) जर दही आंबट नसेल तर थोडा लिंबाचा रस घालावा.

0 comments:

Post a Comment