Pages

Wednesday 3 October 2012

कोल्ड कॉफी - Cold Coffee

Cold Coffee in English

वेळ: ५ ते ८ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
१ कप थंडगार दुध (किंवा हाफ अँड हाफ)
६ टेस्पून कंडेन्स मिल्क (आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो.)
दीड टीस्पून इंस्टंट कॉफी
थोडे बर्फाचे तुकडे

कृती:
१) २ चमचे कोमट दुधात कॉफी मिक्स करून घ्यावी. नंतर हे मिश्रण थंड दुधात घालावे.
२) कोफी मिश्रित थंड दुध, कंडेन्स मिल्क ब्लेंडरमध्ये घालून घुसळून घ्यावे. (गोडपणा कमीजास्त हवा असेलत तर त्यानुसार कंडेन्स मिल्कचे प्रमाण कमीजास्त करावे.)
३) दोन सर्व्हिंग ग्लासेस घ्यावे. त्यात बर्फाचे तुकडे घालावे. त्यावर कॉफी ओतावी. वाटल्यास वरून थोडी कॉफी पावडर भुरभुरावी.
लगेच सर्व्ह करावे.

टीप:
१) आवडीनुसार कंडेन्स मिल्क आणि कॉफीचे प्रमाण अड्जस्ट करावे.
२)  हाफ अँड हाफ म्हणजे दुध आणि क्रीम यांचे समप्रमाणातील मिश्रण. यामुळे कोल्ड कॉफी जास्त घट्ट आणि जास्त फेसाळ होते.

0 comments:

Post a Comment