Pages

Wednesday 18 July 2012

काकडी भोपळी मिरचीचे लोणचे - Cucumber and Capsicum Pickle


वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

साहित्य:
१/२ कप भोपळी मिरचीचे मध्यम चौकोनी तुकडे (१ मध्यम भोपळी मिरची, बिया काढून)
१/२ कप काकडीचे मध्यम चौकोनी तुकडे (२ लहान काकड्या, सोलून)
२ टेस्पून कैरीचा किस (साल काढून कैरी किसावी)
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ टेस्पून मोहोरीची डाळ, १/२ टीस्पून हिंग
चवीपुरते मीठ

कृती:
१) मध्यम काचेच्या बोलमध्ये भोपळी मिरचीचे तुकडे घालावेत. त्यात हळद, मीठ आणि किसलेली कैरी घालावी. मिक्स करून बोलवर झाकण ठेवावे. ८ ते १० तास झाकून ठेवावे, म्हणजे भोपळी मिरचीत कैरीचा आंबटपणा आणि मीठ मुरेल.
२) ८-१० तासांनी काकडी आणि लाल तिखट घालून मिक्स करावे.
३) फोडणीसाठी तेल गरम मंद आचेवर करावे. त्यात मोहोरीची डाळ (महत्त्वाची टीप) आणि हिंग घालून फोडणी करावी. हि फोडणी स्टील किंवा काचेच्या वाटीत काढून ठेवावी. थोडी गार झाली कि भोपळी मिरची-काकडीच्या मिश्रणात घालावी. मिक्स करून लगेच सर्व्ह करावे.
हे लोणचे फार टिकत नाही. त्यामुळे कमी प्रमाणात करावे. फ्रीजमध्ये ३-४ दिवस टिकते.

टिप्स:
१) मोहोरीची डाळ तेलात पटकन जळते. म्हणून तेल खूप तापवू नये. तेल जर तापले तर गॅस बंद करावा. तेल थोडे निवाले कि मग फोडणी करावी.
२) कैरीची चव फार छान लागते. पण कैरी नसल्यास लिंबाचा रसही घालू शकतो.

0 comments:

Post a Comment