Pages

Tuesday 21 February 2012

काकडीचे लोणचे - Kakadiche lonche

Instant Cucumber Pickle in English

वेळ: १० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
how to make instant cucumber pickleसाहित्य:
३/४ कप बारीक चिरलेली काकडी (सोललेली)
२ टेस्पून मोहोरी पावडर (काळी किंवा लाल)
१/४ टीस्पून हिंग
२ टीस्पून पाणी
चवीपुरते मीठ
१ टीस्पून लिंबाचा रस
फोडणीसाठी: १ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून

कृती:
१) चिरलेली काकडी एका लहान वाडग्यात घ्यावी. त्याला १/४ चमचा मीठ लावून घ्यावे. २० मिनिटे तसेच ठेवावे.
२) २० मिनीटांनी काकडीला पाणी सुटेल. ते पाणी हलक्या हाताने पिळून घ्यावे. हे पाणी एका लहान ब्लेंडरमध्ये घ्यावे. त्यात मोहोरी पावडर घालावी आणि फेसावी. जर मिश्रण अगदी घट्ट वाटले तर एखाद टीस्पून पाणी घालावे. दोनेक मिनिटे फेसावे. फेसल्यावर मिश्रण पांढरट दिसेल. हे मिश्रण काकडीत मिक्स करावे.
३) कढल्यात १ टीस्पून तेल घ्यावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी. हि फोडणी एका वाटीमध्ये काढून ठेवावी. थंड झाल्यावर काकडीमध्ये मिक्स करावी.
४) लिंबाचा रस घालून मिक्स करावे. चव पाहून लागल्यास मीठ किंवा लिंबाचा रस घालावा.
काकडीचे झटपट लोणचे जेवणात खायला किंवा पोळीबरोबर खायलाही छान लागते. हे लोणचे फ्रीजमध्ये ३-४ दिवस टिकेल.

टीपा:
१) हे लोणचे फार टिकत नाही म्हणून बेताच्याच प्रमाणात करावे.
२) मीठ लावल्यावर काकडीला पाणी सुटते. म्हणून मोहोरी फेसताना तेच पाणी वापरावे. नाहीतर लोणचे फारच रसदार होते.

0 comments:

Post a Comment